मरकजला जाऊन आलेल्यांनी पुढे यावे; अन्यथा कारवाई- औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

दिल्ली येथील निजामुद्दीन येथे तबलीगी जमातच्या मरकज मध्येजाऊन आलेल्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतःहून पुढे यावे आणि आपली आरोग्य तपासणी करावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे
Tablighi Jammat Markaj Participants Come Forward appeals Aurangabad Collector
Tablighi Jammat Markaj Participants Come Forward appeals Aurangabad Collector

औरंगाबाद:  दिल्ली येथील निजामुद्दीन येथे तबलीगी जमातच्या मरकज मध्ये जाऊन आलेल्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतःहून पुढे यावे आणि आपली आरोग्य तपासणी करावी,  अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.

औरंगाबाद येथील रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. काल एकाच दिवसात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यूही झाला. यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. गेले कित्येक दिवस कोरोनामुक्त झालेल्या औरंगाबाद जिल्हा व शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. सध्या शहरात 11 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिल्लीच्या निजामुदीन मरकज येथून आलेले काही नागरिक जिल्ह्यात  थांबले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अशा व्यक्तीनी  स्वतःहून 0240 2331077 या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली तपासणी करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com