कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिस जनजागृतीसाठी करताहेत लोकांना मार्गदर्शन 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात कसे धुवावेत याची माहिती औरंगाबाद शहर पोलिस रस्त्यावर उभे राहून देत आहेत.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात कसे धुवावेत याची माहिती औरंगाबाद शहर पोलिस देत आहेत.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात कसे धुवावेत याची माहिती औरंगाबाद शहर पोलिस देत आहेत.

औरंगाबाद : राज्यात व देशात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लोकांमध्ये जनजागृतीची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गर्दी टाळण्याचे, दुकाने बंद करण्याचे आवाहन करतानाच औरंगाबाद पोलिस आता नागरिकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात कसे धुवावेत याची माहिती शहरातील प्रमुख रस्त्यांवर, सिग्नलवर उभे राहून देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला कोरोनाच्या विरोधात एकजूट दाखवत उद्या सकाळी 7 ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाहेर न पडण्याचे जनतेच्या कर्फ्यूच्या माध्यमातून आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याचे मोठे आव्हान जसे राज्य सरकार, केंद्र सरकार, आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासना समोर आहे तशीच स्वतः काळजी घेऊन या रोगापासून आपला बचाव करण्याची जबाबदारी नागरिकांची देखील आहे.

पोलिस यंत्रणेकडून गेल्या दोन दिवसांपासून शहरांमध्ये स्पीकर वरून आवाहन केले जात आहे .याशिवाय कोरोनाची लागण टाळण्यासाठी हात स्वच्छ धुवावेत ते कुठल्या पद्धतीने धुवावेत याचे प्रात्यक्षिक पोलिस व वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस कर्मचारी शहराच्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सिग्नलवर उभे राहून नागरिकांना करून दाखवत आहेत.

सरकारी सर्व यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झपाटून कामाला लागले आहेत .अशावेळी पोलीस कर्मचाऱ्यांकडून देखील जनजागृतीचा राबवला जात असलेला हा उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com