जिल्ह्यातील भाजप आमदार वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत

जिल्ह्यातील भाजप आमदार वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत

औरंगाबाद : भाजपने राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे दिलेले निमंत्रण बहुमत नसल्याचे कारण देत नाकारल्यानंतर अनेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघाची वाट धरली, तर बहुतांश भाजप आमदार मुंबईतच ठाण मांडून आहेत. जिल्ह्यातील भाजप आमदार अतुल सावे मुंबईत, प्रशांत बंब पुण्यात, तर हरिभाऊ बागडे औरंगाबादेत असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात आपण सध्या वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी " सरकारनामा' शी बोलतांना दिली आहे. 

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण रविवारी दिले होते. परंतु बहुमताचा आकडा नसल्यामुळे आपण सरकार बनवण्यास असमर्थ असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या मदतीने शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करू शकते अशी परिस्थिती आहे. 

या पार्श्‍वभूमीवर शहरातील पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे, गंगापूरचे प्रशांत बंब यांच्यांशी सरकारनामा प्रतिनिधीने संपर्क साधला. अतुल सावे म्हणाले, मी मुंबईतच आहे, सध्या सगळ्या राजकीय घडमोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, निरोप येताच उपलब्ध व्हा अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत. 

प्रशांत बंब यांनी आपण सध्या पुण्यात असून वैयक्तिक कामासाठी आलो असल्याचे सांगितले. सध्याच्या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवणे एवढेच सध्या आपल्या हाती आहे. आम्ही वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. अधिक माहिती घेतली असता बागडे औरंगाबादेतच असल्याचे कळाले. मुंबई शिवाय राज्यातील ज्या ज्या भागात भाजपचे आमदार आहेत, त्यांना निरोप देऊन तात्काळ मुंबईत हजर राहण्याबाबत सूचना करण्याची जबाबदारी प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com