औरंगाबादमध्ये कॉंग्रेसकडे विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी

 औरंगाबादमध्ये कॉंग्रेसकडे विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ला असला तरी विधानसभेसाठी मात्र इच्छुकांची कॉंग्रेसकडे गर्दी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नऊ मतरासंघासाठी तब्बल 47 जणांनी अर्ज केले आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्यांची त्यात आणखी भर पडेल, असे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री अनिल पटेल, शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार यांनी शुक्रवारी (ता. सहा) सांगितले. 

पत्रकार परिषदेत श्री. पटेल म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार 47 जणांनी अर्ज केले आहेत. सर्वाधिक 11 अर्ज राखीव असलेल्या पश्‍चिम विधानसभा मतदारसंघासाठी आले आहेत. 

असे आले अर्ज... 
पूर्व मतदार संघात माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, जी. एस. ए. अन्सारी, अहेमद हुसेन, डॉ. सरताज पठाण, इब्राहिम पटेल, अशोक जगताप, मोहसीन अहेमद. 
पश्‍चिम विधानसभा मतदार संघातून डॉ. जितेंद्र देहाडे, साहेबराव बनकर, प्रदीप शिंदे, चंद्रभान पारखे, रमेश शिंदे, महेंद्र रमंडवाल, सचिन शिरसाट, पंकजा माने, जयप्रकाश ननावरे, राघोजी जाधव, जयदीप झाल्टे. 
मध्य मतदारसंघातून युसूफ खान (वाय. के. बिल्डर), नगरसेवक अयुब खान, किसान सेलचे मो. हिशाम उस्मानी, मसरूर खान, सागर मुगदिया. 
सिल्लोडमधून प्रभाकर पालोदकर, श्रीराम पाटील, सुनील कोकाटे, कैसर आझाद, राजेश मानकर, भास्कर घायवट. 
कन्नडमधून संतोष कोल्हे, नामदेव पवार, नितीन पाटील, अशोक मगर, अनिल सोनवणे, बाबासाहेब मोहिते, 
तर फुलंब्रीमधून माजी आमदार डॉ. कल्याण काळे, अनिल अंबादास मानकापे, पंचायत समिती सभापती ताराबाई उकिरडे. 
पैठणमधून माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, विनोद तांबे, बाळासाहेब भोसले, शेख तय्यब, सय्यद कलीम. 
गंगापूर-खुलताबादमधून जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, सय्यद कलीम कोंदण. 
वैजापूरमधून जिल्हा परिषद सदस्य तथा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज ठोंबरे, तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळे. 
सत्तारांनी केले "सेटलमेंट' 
कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार अब्दुल सत्तार यांचे राजकारण सेटलमेंटचे होते, असा आरोप पटेल यांनी केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीसोबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एमआयएम पक्ष वगळून "वंचित'सोबत असेल. औरंगाबाद वगळता राज्यात एमआयएमचा प्रभाव नसल्याचे पटेल यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com