औरंगाबादेत एकाच दिवशी आढळले कोरोनाचे सात रुग्ण;  डॉक्टरसह आणखी एकाचा समावेश

औरंगाबाद शहरात आज एकाच दिवसात कोरोनाचे सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुपारी साडेबारा वाजता एका 58 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला . ही घटना घडून काही तास उलटत नाही, तोच एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरसह जॉर्डनहुन प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे .
aurangabad 7 suspect corona patients tested positive
aurangabad 7 suspect corona patients tested positive

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आज एकाच दिवसात कोरोनाचे सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुपारी साडेबारा वाजता एका 58 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला . ही घटना घडून काही तास उलटत नाही, तोच एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरसह जॉर्डनहुन प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे .

औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे .काल सिडको एन-4, आरेफ कॉलनी भागात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन हादरून गेले.

या भागाला सील केल्यानंतर आज सकाळी पुन्हा पाच संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यामुळे शहरातील  कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आठ वर पोहोचला होता .यापैकी एक रुग्ण महिला बरी होऊन घरी गेली तर अन्य सात रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरू आहेत.

 दरम्यान आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घाटीत दाखल असलेल्या एका 58 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सातारा परिसरात राहणाऱ्या रुग्णाच्या मृत्यूमुळे पोलिसांनी हा संपूर्ण भाग सील केला असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे .

मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी  औरंगाबाद शहरात गेल्यानंतर सायंकाळी आणखी नवे दोन कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात एकाच दिवसात कोरोनाबधितांची  संख्या सात वर पोचली आहे. आता औरंगाबाद येथील कोरोना रुग्णाचा एकूण आकडा दहावर पोचला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com