आमदार अतुल सावे यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी

भाजपतर्फे मंडळ निहाय बैठका घेण्यात आल्या यामध्ये इच्छुकांची चाचपणी करण्यात आली यात जवळपास २०० हून अधिक लोक महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आहे वॉर्ड निहाय बैठका घेण्यात येणार आहे. - आमदार अतुल सावे
Atul_Save
Atul_Save

औरंगाबाद : एप्रिलमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार अतुल सावे यांची शनिवारी (ता.२२) निवडणुक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्ती झाल्यावर आमदार सावे म्हणाले, विरोधी पक्षनेते प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यंनी विश्वासाने माझ्यावर निवडणुकीच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. २०१५ च्या महापालिका निवडणुकीच्या वेळीही माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यावेळी प्रामाणिकपणे काम करत भाजपचे नगरसेवक निवडून आणले. आता आता पुन्हा जबाबदारी आल्याने आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त उमेदवार निवडून आणण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे. या निवडणुकात भाजपतर्फे ८० ते ९० जागा लढविण्यात येणार आहेत. युती नसल्याने भाजप स्वबळावर निवडणुकात उतरणार असेही आमदार सावे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com