atul save mla birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस ः आमदार अतुल सावे (भाजप), औरंगाबाद पूर्व मतदारसंघ 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल मोरेश्‍वर सावे यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1962 रोजी झाला. वडील माजी खासदार स्व. मोरेश्‍वर सावे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा लाभला आहे. मूळचे लातूरचे सावे कुटुंब व्यवसायानिमित्त औरंगाबादेत आले आणि इथेच स्थायिक झाले. उद्योजक असलेले मोरेश्‍वर सावे शिवसेनेचे महापौर आणि खासदार होते. अतुल सावे मात्र 97-98 पासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. 

पारंपरिक व्यवसाय साभांळत ते राजकारणात सक्रिय झाले. भाजपचे शहराध्यक्षपद, प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. 2000 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा राजकारणात नशीब अजमावले पण अवघ्या चार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. दरम्यानच्या काळात ते भाजपमध्ये कार्यरत राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने अतुल सावे यांना उमेदवारी दिली आणि ते पहिल्यांदा विधानसभेत पोचले. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा पूर्व मतदारसंघातून भाजपकडून सावे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख