अतुल सावेंनी निवडणूक आयोगाला केले मालामाल !

Atul_Save
Atul_Save

औरंगाबाद: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्‍कादाय लागले. यामूळे राजकारणातील वेगवेगळ्या मतदारसंघात रंगलेले डावपेच त्या-त्या मतदारसंघाचा निकाल बदलणारे ठरले.

असाच काहीसा निकाल औरंगाबादच्या तिन्ही मतदारसंघात लागला. यात सर्वाधिक उमेदवार असलेल्या पुर्व मतदारसंघात 34 पैकी 32 उमेदवारांचे डिपॉझीटही जप्त झाले. राज्यातील सर्वाधिक डिपॉझीटही जप्त झालेल्या उमेदवारांचा पुर्व हा कदाचित हा पहिला मतदारसंघ असेल.


विधानसभा लढविण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे 10 हजार रुपये डिपॉझिट ठेवावे लागते . उमेदवार मागास प्रवर्गातील असला तर त्याला पाच हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते .  अतुल सावेंमुळे 32 उमेदवारांना आपले डिपॉझिट गमवावे लागले आहे . त्यामूळे निवडणूक आयोग मालामाल झाला आहे . 


औरंगाबाद पुर्व हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होतो. मात्र एमआयएमच्या एंट्रीमूळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदार हा एकगठ्ठा एमआयएमकडे गेला आणि हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनला. या मतदारसंघात यावेळी महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे विजयी झाले. त्यांनी एमआयएमचे उमेदवार डॉ.गफ्फार कादरी यांचा 13 हजार 930 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात 3 लाख 19 हजार 155 मतदार होते. त्यापैकी 1लाख 93 हजार 394 मतदारांनी मतदान केले. यात 1953 मते नोटाला मिळाली, तर 109 मते बाद झाली.

या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार निवडणूक लढवत होते. यात 23 अपक्ष तर 14 मुस्लिम आणि 11 बहुजन समाजाचे उमेदवार होते. पुर्व मध्ये एमआयएम आणि वंचितच्या मतदारांचा टक्‍का सर्वाधिक आहे. यामूळे एमआयएमसह 13 मुस्लिम आणि 11 बहुजन समाजाचे उमेदवार रिंगणात होते. यामूळे 13 मुस्लिम उमेदवार हे एमआयएमचे तर 11 उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीची मत विभागतील असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसले.

34 उमेदवारपैकी केवळ महायुतीचे उमदेवार अतुल सावे आणि एमआयएमचे उमेदवार डॉ.गफ्फार कादरी यांच्यातच थेट लढत झाली. मतविभाजनासाठी केले जाणारे दावे फोल ठरले. या निवडणुकीत पाच उमेदवार वगळता 29 उमेदवारांना हजार मतांचाही टप्पा गाठता आला नाही.

अशी मिळाली मते

अतुल सावे----------93966
डॉ.गफ्फार कादरी----- 80036
कलीम कुरैशी---------- 5555
किशारे म्हस्के----------3970
ईसा यासेन------------ 2395

यांचे डिपॉझीट गुल

किशोर म्हस्के(बसप),

इसा यासेन,

कलीम कुरैशी(समाजवादी पक्ष),

जिया उल्ला अकबर शेख,

दुष्यंत पाटील,

बाबासाहेब शेळके, राहुल मानकर,

शिवप्रसाद पगार,

अब्दुल अजीम अब्दुल अजीज शेख,

अय्युब खान, उद्धव बनसोडे,

किरण शिरवत,

दिनेश गवळे,

दैवशाली झिने,

निता भालेराव,

भजुंग,

मोहम्मंद जाकेर अब्दुल खौदर,

महेंद्र सोनवणे,

मुकुंद घोरपडे,

युसूफ मुकाती,

ऍड. रमेश खंडागळे,

राहुल इंगळे,

लियाकत खान,

विशाल पाखरे,

शफीक बुढाण शेख,

शफिक शेख शेख खाजा किस्मतवाला,

करीम हुल हसन सय्यद खाजा,

सिद्धार्थ साबळे,

सुरेश इंगळे,

सुवर्णा भोसले,

हानिफ शाह,

प्रा. डॉ. हरिदास नागरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com