अतुल सावे म्हणाले, इमतियाज जलील यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोदींच्या निर्णयावर हसावे की रडावे असे म्हणत टीका केली होती. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी इम्तियाज जलील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
atul savatul save criticizes mim mp imtiaz jaleele criticizes mim mp imtiaz jaleel
atul savatul save criticizes mim mp imtiaz jaleele criticizes mim mp imtiaz jaleel

 औरंगाबाद : कोरोनाविरोधात संपूर्ण देश एकवटला आहे,  या संकटाचा सामना आपण एकतेच्या जोरावर यशस्वीपणे करू शकतो , ही भावना देशवासीयांनमध्ये रुजवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री घरातील विजेची उपकरणे बंद करून दिवे, मेणबत्या आणि बॅटरी लावण्याचे आवाहन केले आहे. यामागे कुठलाही राजकीय हेतू किंवा स्वार्थ नाही, परंतु हे कळण्याइतपत बुद्धी ज्यांच्याकडे नाही त्या जलील यांची कीव करावीशी वाटते, अशा शब्दात भाजपचे आमदार अतुल सावे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना टोला लगावला.

जनता कर्फ्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या काळात आज रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत घरातील सर्व विजेचे दिवे बंद करून मेणबत्या, मोबाईल टॉर्च, बॅटरी व दिवे लावण्याचे देशवासीयांना आवाहन केले .यावरून अनेकांनी समर्थन केले तर काहींनी मात्र टीकेची झोड उठवली .

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोदींच्या  निर्णयावर हसावे की रडावे असे म्हणत टीका केली होती. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी इम्तियाज जलील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. सरकारनामाशी बोलताना अतुल सावे म्हणाले , देशावर जेव्हा एखादे मोठे संकट येतेे, तेव्हा जनतेला दिलासा देऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न असतो.

कोरोना या जागतिक महामारीचा देशातील जनता एकत्रितपणे येऊनच मुकाबला करू शकते, हीच भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहन करण्यापाठीमागे आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे प्रतीक म्हणून दिव्याकडे बघितले जाते .आपण लहानपणापासून सायंकाळच्या वेळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती कल्याणम म्हणत आलो आहोत. 

त्यांना दिवे लावण्याचा अर्थ कळतो ?
यामागे मनुष्याच्या जीवनातील अंधकार नाहीसा होऊन जीवन प्रकाशमान व्हावे हा हेतू असायचा.आज कोरोनापासून आपले रक्षण करण्यासाठी देशभरातील लाखो डॉक्टर्स , पोलीस अधिकारी, कर्मचारी, नर्स,  सफाई कर्मचारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी राज्य सरकार व संपूर्ण आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून राबत आहेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील हा एक प्रयत्न आहे.

 यातून कुणालाही राजकारण करायचे नाही किंवा कुठला स्वार्थ देखील नाही. मात्र हे कळण्याइतपत बुद्धी ज्यांच्याकडे नाही त्यांच्याबद्दल काय बोलावे? दिवे लावण्याचा अर्थ ज्या इम्तियाज जलील यांना कळत नाही त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते अशा संतप्त भावना देखील अतुल सावे यांनी व्यक्त केल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com