भाजपकडून चांगले काम करणाऱ्यांनाच संधी - अतुल सावे

नेत्यांच्या मुलांची तिकिटासाठी फिल्डिंगशहरात पक्षाचे संघटन चांगलेच मजबूत झाले आहे. या संघटनासाठी प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे. किमान महानगरपालिकेचे तिकीट आपल्याला मिळेल, या आशेवर संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नजरा आता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे लागल्या आहेत. मात्र पक्षात काही जागांवर वरिष्ठांच्या मुलांसाठीही फिल्डिंग लावण्यात येत असल्याची कुजबुज आहे.
 भाजपकडून चांगले काम करणाऱ्यांनाच संधी - अतुल सावे

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपतर्फे शहरातील 115 वॉर्डातून लढण्यासाठी तब्बल साडेसहाशे इच्छूकांनी अर्ज घेतले आहेत. पक्षात उत्साहाचे वातावरण आणि इच्छुकांची संख्या अधिक असली तरी चांगले काम करणाऱ्यालाच उमेदवारी दिली जाईल असे आमदार तथा महापालिका निवडणुक प्रमुख अतुल सावे यांनी स्पष्ट केले. 

महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. राज्यातील बदलती सत्ता समीकरणे पाहता भाजप सर्वच वार्डातून उमेदवार देणार आहे. स्वबळावर शिवसेनेला पराभूत करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भाजपने ताकदीचे उमेदवार देण्यावर भर दिला आहे. भाजपच्यावतीने 26 फेब्रुवारीपासून इच्छुकांसाठी अर्ज वाटप सुरू करण्यात आले. शहरात गेल्या पाच वर्षात भाजपचे संघटन मजबूत झाल्यामुळे अनेकजण भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 

गेल्या महिन्यापासून भाजपच्यावतीने मंडळनिहाय बैठका घेण्यात आल्या, यात दोनशे जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या निवडणुकीत पक्षातील निष्ठावंतासह नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा नेत्यांचा मानस आहे. भाजपच्या विभागीय कार्यालयात इच्छुकांसाठी नाव नोंदणी आणि अर्ज वाटप सुरू आहे. पहिल्या दिवशी 187 जणांनी अर्ज नेले होते तर आतापर्यंत साडेसहाशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. अर्ज वाटप प्रक्रिया 5 मार्चपर्यंत चालणार आहे. त्यानंतर कोणत्या उमेदवाराला कुठल्या वार्डातून संधी द्यायची याचा निर्णय निवड समिती घेणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com