" तुमचे वडील माझे मित्र होते ', सावेंच्या प्रचारात वृध्द मतदारांकडून आठवणींना उजाळा

" तुमचे वडील माझे मित्र होते ', सावेंच्या प्रचारात वृध्द मतदारांकडून आठवणींना उजाळा

औरंगाबाद : " तुमचे वडील मोरेश्‍वर सावे आणि मी जुने मित्र, तुम्ही लहानपणी आमच्या घरी खेळायला येत होता, काळजी करू नका, माझा आशिर्वाद आहे तुम्हाला' असे म्हणत पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे यांच्या प्रचार यात्रेत वृध्द मतदारांकडून मोरेश्‍वर सावे यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अतुल सावे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर "लोकाशिर्वाद'च्या माध्यमातून प्रचाराला सुरूवात केली आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी, केलेल्या विकासकामांची माहिती आणि नव्याने जनतेच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा सावे जाणून घेत आहेत. प्रचारात त्यांना अनेक अनुभव येत आहेत, कधी लोक केलेल्या कामांचे तोंडभरून कौतुक करतात, तर दोन मिनिटांच्या जिव्हाळ्याच्या चर्चेत जुन्या आठवणींना उजाळा देखील देतात. 

मतदारसंघातील मायानगर, ठाकरेनगर भागात नुकताच सावे यांचा जनसंपर्क दौरा पार पडला. तरुण, महिला, वयोवृध्द आणि उद्याचे मतदार ठरणारी लहान मुले अशा सगळ्याच्याच सावे भेटीगाठी घेत आहेत. ठिकठिकाणी औक्षण, हार आणि पुष्पवृष्टीने स्वागत होत असल्याने अतुल सावे चांगलेच भारावत आहेत. अशाच जनसंपर्क दौऱ्या दरम्यान, ठाकरेनगरात सावेंची भेट एका 80 वर्षांच्या आजोबांशी झाली. वयामुळे ऐकू न येणे, स्मरण न राहणे यामुळे त्यांनी सावे यांची विचारपूस केली. तेव्हा सोबतच्या कार्यकर्त्यांनी " आजोबा हे आपल्या मतदारसंघाचे आमदार अतुल सावे आहेत, तुमचा आशिर्वाद घ्यायला आले आहेत असे सांगतिले. 

तेव्हा आजोबांना मोरेश्‍वर सावे यांची आठवण झाली आणि "अहो तुमचे वडील माझे चांगले मित्र होते, आम्ही नेहमी सोबत असायचो, तुम्ही लहान असतांना आमच्याकडे खेळायला यायचात असे म्हणत जुन्या आठवणींना उजाळा दिला. "काळजी करू नका, तुम्हाला माझा आशिर्वादच आहे' असे म्हणत आजोबांनी मायेने सावे यांच्या डोक्‍यावरून हात फिरवला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com