विकासाचा पुढचा टप्पा गाठायचायं ; पाठबळ द्या - अतुल सावे

 विकासाचा पुढचा टप्पा गाठायचायं ; पाठबळ द्या - अतुल सावे

औरंगाबाद : आपण दिलेल्या पाठबळावर आजवर अविरत प्रयत्न करून शहराचा विकास करत आलो, आता विकासाचा पुढचा टप्पा गाठायचांय, तुमचं पाठबळ असू द्या असे आवाहन राज्यमंत्री तथा पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केले आहे. सायंकाळी प्रचार संपत असल्यामुळे सावे यांनी मतदारसंघातून वाहन रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 

पूर्व मतदारसंघात सावे यांची लढत एमआयएमच्या डॉ. गफ्फार कादरी यांच्याशी होत आहे. सावे यांनी साडेचार वर्ष आमदार म्हणून तर पाच महिने राज्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम केले. राज्यमंत्री पदाची पाच महिने त्यांच्यासाठी महत्वाची ठरली. या पाच महिन्यात शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना मंजुर करून आणण्यात त्यांना यश आले. याशिवाय साडेचार वर्षाच्या आमदारपदाच्या काळात मतदारसंघातील सिमेंट रस्ते, भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामे केली. पाणी, कचरा, वीज या मुलभूत प्रश्‍नांवर वेळोवेळी त्यांनी विधानसभेत आवाज उठवत भरघोस निधी देखील आणला. या विकासकामाच्या जोरावरच ते दुसऱ्यांदा मतदारांना सामोरे जात आहेत. 

गेल्या दोन आठवड्याच्या प्रचारात मतदारसंघात सावे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी त्यांचे झालेले भव्य स्वागत पाहता विकासकामांची पावती मतदार आपल्याला निश्‍चित देतील असा विश्‍वास सावे यांनी व्यक्त केला आहे. विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी तुमच्या पाठबळाची आवश्‍यकता असल्याचे सांगत आपल्या पुन्हा सेवेची संधी द्या असे आवाहन त्यांनी वाहन रॅलीच्या माध्यमातून आज केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com