हिंदुत्व आणि विकासाच्या जोरावर भाजपचे पन्नास नगरसेवक निवडून आणू - अतुल सावे

महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. मंडळ, वार्डनिहाय बैठका, सर्व्हे आदी कामांना आता वेग आला आहे. आम्ही 75 ते 80 जागा लढवणार आहोत. या पैकी पन्नात ते पंचावन्न नगरसेवक निवडूण आणण्याचे आमचे उदिष्ठ आहे. राज्यमंत्री असतांना शहरातील नागरी प्रश्‍न तसेच उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी मी केलेले प्रयत्न जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. त्याची पावती महापालिका निवडणुकीत लोक भाजपला निश्‍चितच देतील. या विकासकामांच्या जोरावरच आम्ही 40 जागा नक्की जिंकू असा आत्मविश्‍वास देखील अतुल सावे यांनी व्यक्त केला.
हिंदुत्व आणि विकासाच्या जोरावर भाजपचे पन्नास नगरसेवक निवडून आणू - अतुल सावे

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीत खरे हिंदुत्ववादी कोण हे मतदारांना सांगतानाच युती सरकारच्या काळात शहरासाठी आणलेला निधी आणि केलेली विकासकामे या जोरावर आम्ही पन्नास नगरसेवक निवडून आणू असा दावा भाजपचे आमदार अतुल सावे यांनी "सरकारनामा'शी बोलतांना केला. पंचवीस वर्ष महापालिकेच्या सत्तेत मित्रपक्ष राहिलेल्या शिवसेनेने राज्याच्या सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, त्यामुळे ते आणि आम्ही आता स्वबळावर लढणार आहोत असेही सावे यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये होत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच्या या निवडणुकीत खऱ्या अर्थाने शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांचा कस लागणार आहे. कालपर्यंत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून कारभार हाकणारे आता विरोधात उभे ठाकणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपची निवडणूक रणनिती काय असणार आहे ? या संदर्भात अतुल सावे यांच्याशी बातचीत केली. 

अतुल सावे म्हणाले, येणारी महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. शिवसेनेने राज्यातील सत्तेसाठी भाजपची साथ तर सोडलीच पण हिंदुत्वालाही बगल दिली आणि नेमका याचाच फायदा आम्हाला महापालिका निवडणुकीत होणार आहे. केवळ हिंदुत्वाचा मुद्दाच नाही तर पाच वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात या शहरासाठी आणलेला निधी आणि त्यातून केलेली विकासकामे हे आमचे प्रचारातील प्रमुख शस्त्र असणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेऊन पाकिस्तान, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा नागरिकत्व कायदा केंद्रातील भाजप सरकार लागू करू पाहत आहे, तर हीच शिवसेना विरोधाची भूमिका घेत आहे. 

कलम 370, राम मंदिराचा प्रश्‍न आणि आता एनआरसी, सीसीएच्या माध्यमातून देशात मोठे निर्णय भाजप सरकारने घेतले आहे. त्यामुळे खरे हिंदुत्ववादी कोण हे जसे देशातल्या जनतेला कळाले आहे तसे ते औरंगाबादच्या नागरिकांना देखील कळाले आहे. 

महाविकास आघाडीकडून छदामही नाही... 
राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतांना शहरासाठी राज्यमंत्री म्हणून आम्ही आतापर्यंतचा सर्वात जास्त निधी आणला. रस्त्यांसाठी 125 कोटी, कचऱ्यासाठी 135, पाणीपुरवठा योजनेसाठी 1680 कोटी यासह स्मार्टसिटीसाठी कोट्यावधींचा निधी त्या काळात मिळाला. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शहरासाठी एक छदामही मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे. एवढेच नाही तर आमदारांना देखील अद्याप या सरकारने निधी दिलेला नसल्याचे सावे यांनी सांगितले. 

भाजप 80 जागा लढवणार.. 
महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. मंडळ, वार्डनिहाय बैठका, सर्व्हे आदी कामांना आता वेग आला आहे. आम्ही 75 ते 80 जागा लढवणार आहोत. या पैकी पन्नात ते पंचावन्न नगरसेवक निवडूण आणण्याचे आमचे उदिष्ठ आहे. राज्यमंत्री असतांना शहरातील नागरी प्रश्‍न तसेच उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी मी केलेले प्रयत्न जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. त्याची पावती महापालिका निवडणुकीत लोक भाजपला निश्‍चितच देतील. या विकासकामांच्या जोरावरच आम्ही 40 जागा नक्की जिंकू असा आत्मविश्‍वास देखील अतुल सावे यांनी व्यक्त केला. 
 
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com