मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 323 मुलिस्म लोकांना मदत मिळवून दिली : अतुल सावे

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 323 मुलिस्म लोकांना मदत मिळवून दिली : अतुल सावे

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे उद्योग, अल्पसंख्याक, वक्‍फ बोर्डचे खाते दिले. यानंतर गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईच होणारा उर्दू विभागाचा पुरस्कार वितरण आणि मुशायराचा कार्यक्रम औरंगाबादेत आणला. हे खाते माझ्याकडे आल्यानंतर मी सातशे लोकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत केली. विशेष म्हणजे यात 323 लोक मुस्लिम आहेत. म्हणजे काम करताना मी कोणत्या धर्माचा व समाजाचा आहे हे पहात नाही असे राज्यमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

अल्पसंख्याक विकास विभाग, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आणि उर्दू साहित्य अकादमीच्या वतीने उर्दु साहित्यातील उत्कृष्ठ योगदान देणाऱ्या 122 जणांना विविध पुरस्कार वितरण आणि मुशायराचा कार्यक्रम घेण्यात आला. श्री.सावे म्हणाले, तुम्हाला एमआयएमचा डर आहे का असे एका पत्रकाराने विचारले होते. मला एमआयएचा डर असता तर मी खासदार इम्तियाज जलील यांना कार्यक्रमाला बोलविले नसते. आणि हा कार्यक्रम सरकारचा आहे. आणि मी माझ्या कामात कधीही राजकारण आणत नाही. 

सातत्याने आमच्या सरकारवर जातीयवादाचा आरोप केला जात आहे. तो आरोप खोटा आहे. नरेंद्र मोदी सरकार सर्वांसाठी काम करीत आहेत. असे सांगत नांदेड आणि मालेगाव येथे उर्दू अकादमी सुरु करणार आहे. औरंगाबादला ही अकादमी सुरु करणार आहे. यासह हज हाऊसचे कामही लवकर पूर्ण होणार आहे. अल्पसंख्याक समाजासाठी कौशल्य विकास योजनेचे टेंडर काढण्यात आले आहे. तुमच्या आणखी काही मागण्या असेल तर मांडा मी त्या सरकारपर्यंत पोहचवीन असेही सावे म्हणाले. 

माझ्या वडिलांचे शिक्षण हे हैदराबादमध्ये झाल्यामूळे त्यांना उर्दू येत होती. त्यामूळे पेपर वाचताना ते पहिले उर्दू पेपर वाचत होते. उर्दूचे या शहराशी जुने नाते आहे. मुंबई बाहेर सुरु झालेला उर्दू अकादमीचा पुरस्कार वितरण सोहळा पुढील वर्षीही औरंगाबादेत करणार असल्याचे सांगत पुढील वर्षीच्या कार्यक्रमात मी उर्दूतून भाषण करणार असल्याचा शब्द सावे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com