atul save and aurangabad election | Sarkarnama

शहरातील पाणी, कचरा प्रश्‍न सोडवणार - अतुल सावे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : शहरातील पाणी, कचऱ्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी युती सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यासाठी निधी देखील उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे लवकरच हे दोन्ही प्रश्‍न सोडवले जातील असा विश्‍वास राज्यमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महायुतीच्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सावे यांनी शहरवासियांना शब्द देत त्यांच्याशी चर्चा देखील केली. 

औरंगाबाद पुर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अतुल सावे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शहरातील मुलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, पाठपुरावा आणि खेचून आणलेला निधी या मुद्यांवर ते मतदारांचा आशिर्वाद मागत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत सावे यांनी पुन्हा एकदा शहरवासियांना पाणी, कचऱ्याचा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. सावे म्हणाले, शहरातील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे यांनी व्यक्तीश लक्ष घातले. कचऱ्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी सरकारने तात्काळ दिला. कचऱ्याप्रमाणेच पाण्याचा प्रश्‍न देखील निकाली काढण्यात आम्हाला यश आले आहे. 

युती सरकारने 1680 कोटी रुपयांची योजना जाहीर करून प्रत्यक्षात त्याचे काम सुरू करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील नागरिकांना स्वच्छ शहर आणि मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. पाणी, कचरा प्रश्‍न सोडवतांनाच नागरिकांना चांगले दर्जेदार रस्ते देण्यासाठी देखील सरकारने 124 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून अनेक भागातील रस्ते पुर्ण झाले आहेत, तर काहींची कामे सुरू असल्याचे अतुल सावे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख