भव्य वाहन रॅलीच्या शक्तीप्रदर्शनाने अतुल सावे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 भव्य वाहन रॅलीच्या शक्तीप्रदर्शनाने अतुल सावे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

औरंगाबाद : पूर्व मतदारसंघातून भाजपा-शिवसेना-रासप-रिपाई (आ)- रयतक्रांती-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे यांनी भव्य वाहन रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. ढोल-ताशे आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात सावे यांनी सकाळी गजानन महाराज मंदिर चौकातून वाहन रॅलीला प्रारंभ केला. शिवसेना-भाजप युती जाहीर झाल्यानंतर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे अतुल सावे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर सावेंनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी साडेआठपासूनच गजानन महाराज मंदीर चौकात आपापली वाहने घेऊन शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 

वाहन रॅलीला सुरूवात झाल्यानंतर जयभवानी नगर चौक, वंसतराव नाईक चौक, कॅनॉट गार्डन, चिस्तीया पोलीस चौकी, बजरंग चौक मार्गे एन-7 येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचली. तिथे रॅलीचा समारोप झाल्यानंतर औरंगाबाद पुर्व 109 विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय, एन-12 हडको येथे जाऊन अतुल सावे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींची यावेळी उपस्थिती होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com