बेरोजगारांसाठीच्या अभियानातून सावे यांची "कौशल्य' पुर्ण कामगिरी

 बेरोजगारांसाठीच्या अभियानातून सावे यांची "कौशल्य' पुर्ण कामगिरी

औरंगाबाद : गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, एमआयएम, शिवसेनेला टक्कर देत पूर्व मतदारसंघात भाजपचे कमळ पुन्हा फुलवणारे विद्यमान आमदार अतुल सावे 2019 मधील निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यावर जोर देतांना तरुण-बेरोजगारांच्या प्रश्‍नाला देखील हात घालत त्यांनी आपल्यातील राजकीय "कौशल्य' दाखवून दिले आहे. रविवारी मतदारसंघात बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास नोंदणी अभियानाची सुरूवात सावे यांनी केली. 

अतुल्य महारोग्य शिबिरानंतर आमदार सावे यांनी बेरोजगार तरुणांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कौशल्य विकास नोंदणी शिबिराचा कार्यक्रम हाती घेत तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित केले. या शिवाय व्यक्‍तीगतरित्या सर्व घटकांच्या संपर्कात राहण्यासाठी सावे यांनी गेल्या दीड दोन वर्षात विविध उपक्रम मतदारसंघात राबवले. ज्येष्ठांसाठी श्रावण महिन्यात मोफत वेरुळ दर्शन, महिलांसाठी हळदी कुंकू, तरुणांसाठी दहिहंडी महोत्सव आणि जॉबकार्डचे वाटप करत त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून त्यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. नोंदणी अभियानाला स्वःत अतुल सावे उपस्थित होते. एक हजाराहून अधिक तरुण-तरुणींनी या अभियानात सहभाग नोंदवला. 

इंग्लीश स्पीकिंगसह सबकुछ... 
या अभियानातून बेरोजगारांना इंग्लिश स्पीकिंग कोर्स, बेसिक कॉम्प्युटर कोर्स, टॅली, महिलांसाठी शिवणकाम, कापडी पिशवी, सेल्स मॅनेजर, शोरूम मॅनेजर, रिटेल मॅनेजर, अकाउंट असिस्टंट, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी, ऑटोमोबाईल, शोरूम, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्‍स येथील आवश्‍यक असलेल्या मुष्यबळासाठीचे प्रशिक्षण असे सबकुछ देण्यात येणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com