मे महिन्यात आमदार राणे आणि हायवे ठेकेदाराच्या बैठका झाल्या होत्या! 

आमदार नीतेश राणेंचे आंदोलन म्हणजे स्टंटबाजीचा प्रकार होता. अशा आंदोलनातून काहीही निष्पन्न होणार नाही. उलट जिल्ह्यातील अधिकारी बाहेर गेले तर विकासप्रक्रियाच ठप्प होणार आहे. जनतेचे प्रश्‍न विधीमंडळात जाऊन सोडवता येत नसल्याने राणेंना अशी हुल्लडबाजीची आंदोलने करावी लागत असल्याचीही टीका त्यांनी केली.
मे महिन्यात आमदार राणे आणि हायवे ठेकेदाराच्या बैठका झाल्या होत्या! 

कणकवली (सिंधुदुर्ग): शहरातील महामार्ग 15 दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुढील आठ दिवसांत महामार्ग सुरळीत झाला नाही तर ठेकेदाराला रस्त्यावर आणू, असा इशारा भाजप नेते अतुल रावराणे यांनी दिला. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली.

येथील भाजप कार्यालयात श्री. रावराणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश सावंत, प्रज्ञा ढवण, दीपक सांडव, प्रीतम मोर्ये आदी उपस्थित होते.

रावराणे म्हणाले, "आठ दिवसापूर्वी पालकमंत्री केसरकर यांनी हायवे प्रश्‍नी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात महामार्ग अधिकारी, ठेकेदार यांनी पंधरा दिवसांत खारेपाटण ते झाराप या रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि महामार्ग सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आणखी आठ दिवस आमदार राणे यांनी थांबणे आवश्‍यक होते; पण स्टंटबाजीची सवय झालेल्या राणेंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्यांना चक्‍क चिखलाची अंघोळ घातली. पुलाला बांधून ठेवले. हा प्रकार पूर्णतः चुकीचा आहे. श्री. राणे हे कणकवली मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांनी विधीमंडळात जाऊन तसेच लोकशाही मार्गाने हा प्रश्‍न सोडवणे आवश्‍यक होते.''

पुढील आठ दिवसापर्यंत हायवे सुरळीत होण्याची आम्ही प्रतीक्षा करणार आहोत. या कालावधीत महामार्ग सुरळीत न झाल्यास आम्ही हायवे ठेकेदाराला महामार्गाची पाहणी करण्यासाठी त्याला रस्त्यावर आणणार आहोत; मात्र आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने असेल अशी ग्वाही देखील श्री. रावराणे यांनी दिली.

मे महिन्यात आमदार राणे आणि हायवे ठेकेदाराच्या बैठका झाल्या होत्या. त्याचवेळी राणेंनी हायवेची कामे पूर्ण करून घेणे गरजेचे होते. आता पावसात महामार्गावर खड्डे पडल्यानंतर ते अधिकाऱ्यांना मारहाण करीत आहेत. आंदोलनावेळी त्यांनी ठेकेदाराला का बोलावले नाही. केवळ हायवे अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा बळी का देता असा प्रश्‍न श्री.रावराणे यांनी उपस्थित केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com