`आजी-माजी आमदारांना जनता कंटाळली; अतुल देशमुख सक्षम पर्याय`

`आजी-माजी आमदारांना जनता कंटाळली; अतुल देशमुख सक्षम पर्याय`

आंबेठाण : खेड तालुक्यात सध्या दोन्ही आमदारांची एमआयडीसीत ठेकेदारीसाठी जीवघेणी स्पर्धा आहे. मागच्या काळात आजी-माजींना संधी दिल्यानंतर ते जनतेशी मालक असल्यासारखे वागले. आमदार हा जनतेचा सेवक असावा मालक नसावा, अशी खरमरीत टीका करीत अतुल देशमुख यांच्या रूपाने तिसरा पर्याय आम्ही तालुक्‍याला दिला आहे. त्यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन माजी उपसभापती आणि पंचायत समिती सदस्य अमोल पवार यांनी राजगुरुनगर येथे केले.

या प्रसंगी जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील, चांगदेव शिवेकर, उपसरपंच ऋषिकेश बेल्हेकर, भाऊसाहेब होरे, बाजीराव डुंबरे, रामदास बोत्रे, संभाजी घारे, सचिन नवले, पांडुरंग दुडे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, कालिदास वाडेकर, रामदास मेदनकर, राजन परदेशी, दिलीप वाळके यांच्यासह राजगुरुनगर आणि आळंदी नगर परिषदेतील नगरसेवक उपस्थित होते.

पवार म्हणाले, ""तालुक्‍यात शेकडो प्रश्न शिल्लक असताना यांच्या वैयक्तिक हेवेदाव्यात तालुक्‍याचे नुकसान होत आहे. आमच्याकडे पुढारी कमी असले तरी हाडाचे कार्यकर्ते कमी नाहीत. या दोघांना सोडून तिसरा पर्याय द्या अशी जनतेची मागणी होती, ती आम्ही पूर्ण केली आहे. सध्या अनेकजण या दोघांच्या दहशतीमुळे पुढे येत नसून त्यांनी आतून पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोघांच्या राजकारणाला कंटाळलेली जनता भोसरीप्रमाणे अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणार आहे.''

तालुक्‍यात आमदारांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाच्या वल्गना केल्या आहे; पण विकास दिसतो कुठे? भाजपचा सोडून विद्यमान आमदारांचा निधी किती हे त्यांनी सांगावे. गोड बोलून वेळ निघते. पण समाजाचा विकास होत नाही. विकासाच्या नावाखाली या दोघांनी जनतेची फसवणूक केली असून त्यांचे पितळ आता उघडे पडल्याने जनता ठामपणे आमच्या मागे येत आहे, असे अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com