atul deshmukh asks question to mla and ex mla | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
बारामती : बारामतीत अजित पवार आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

खेडमधील किती तरुणांना आजी-माजी आमदारांनी रोजगार दिले : अतुल देशमुख यांचा सवाल

रूपेश बुट्टे पाटील
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

आंबेठाण : खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात एमआयडीसी आली. पण त्यात किती स्थानिकांना रोजगार दिले. याबाबत आजी-माजी आमदार गप्प का राहिले?. असा सवाल अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी बिरदवडी (ता. खेड) येथे केला.

विधानसभेच्या प्रचारानिमित्त आयोजित गावभेट दौऱ्यात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टेपाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, कैलास गाळव, संजय रौंधळ, सुनील देवकर, काळूराम पिंजण, बाळासाहेब नाणेकर, भाऊसाहेब कुटे, दत्तात्रेय मांडेकर, गुलाबराव खांडेभराड, राहुल येवले यांच्यासह विविध गावचे सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दोन्ही आमदारांनी स्वतःच्या नातेवाइकांच्या नावाने ठेके घेऊन पोळी भाजली. कारखानदार आणि तरुण यांच्यात समन्वय घडून तरुणांना नोकऱ्या देणे आमदारांना शक्‍य होते. अनेक तरुणांवर माजी आमदारांनी खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे गुंडगिरी करणाऱ्या माजी आमदाराला आणि निष्क्रिय ठरलेल्या आजी आमदाराला घरी बसविण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहन अतुल देशमुख यांनी केले.

आजी आमदारांना 700 तरुणांचे नोकरीसाठी अर्ज दिले. पण त्यांनी त्याला केराची टोपली दाखविली. गुणवत्ता असून स्थानिकांना संधी मिळत नाही हे लोकप्रतिनिधीचे अपयश आहे. खासदार दिल्लीला आणि हा मुंबईला अशी यांची जोडी होती. आजी-माजी दोघे सत्तेत मश्‍गूल आहे. पुण्याला पाणी जात असताना हे दोघे गप्प का, असा सवाल त्यांनी केला.

शरद बुट्टेपाटील म्हणाले, ""दोन वर्षांपासून तालुक्‍यात आमदार बदलाची चर्चा सुरू होती. त्याला आम्ही सक्षम पर्याय दिला आहे. आजी आमदारांना शिवेवरच्या गावांत देखील विकासकामे करता आली नाही. आम्ही निधी खेचून आणून कामे केली.''

युती धर्म पाळा असे म्हणणाऱ्या शिवसेना नेत्यांनी, ""तुम्ही किती युती धर्म पाळला?'' असा सवाल गुलाबराव खांडेभराड यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख