atul bhosale talk with maratha activist in karad | Sarkarnama

मराठा बांधवांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवले : अतुल भोसले 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कराड (सातारा) : मराठा आरक्षणप्रश्नी कराड येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी आज प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दर्शविला. 

दत्त चौक येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भरपावसात डॉ. भोसले यांनी थेट रस्त्यावर ठाण मांडून मराठा कार्यकर्त्यांसमवेत आंदोलकांच्या मागण्यांबाबत सहमती दर्शविली. 

मराठा समाजातील नागरिक या नात्याने मी आपल्यासोबत असून, समाजबांधवांचे म्हणणे मी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केले आहे, असे प्रतिपादन डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी केले. तसेच मराठा समाजाच्या भविष्याचा विचार करून समाजाला कायमस्वरूपी न्याय स्वरूपाचे आरक्षण देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख