..तर आम्ही उदयसिंह पाटील उंडाळकरांचे काम करु : अतुल भोसलेंचे सूचक वक्तव्य 

atul bhosale ready to help udyasingh undalkar
atul bhosale ready to help udyasingh undalkar

कऱ्हाड : युतीच्या विचारामध्ये जो जोईल त्याचे स्वागतच आहे, आमहाला अडचणच नाही. उदयसिंह पाटील तिकडे गेले तरी चांगले. इथे आले तरीही चांगले. ते भाजपमध्ये आले आणि त्यांना जर उमेदवारी दिली तर त्यांचे काम करु, असे सूचक वक्तव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले.

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील युवा नेते आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र  उदयसिंह पाटील हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे. त्याबद्दल तुमचे काय मत आहे, या प्रश्नावर अतुल भोसले बोलत होते.

ते म्हणाले, ``युतीच्या विचारामध्ये जो जाईल त्याचे स्वागतच आहे. अडचणच नाही. तिकडे गेले तरी चांगले. इथे आले तरीही चांगले. ते भाजपमध्ये आले आणि त्यांना जर उमेदवारी दिली तर त्यांचे काम करु. अन्यथा पक्ष ज्याला संधी देईल त्याचे काम करु. इथे वैयक्तिक कोणाचीही महत्वकांक्षा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मोठे करुन पुन्हा तेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही काम करु.``

``राज्याचे आणि जिल्ह्याचे जागावाटपाचे समीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे ठरवतील. त्यानंतर कोणी कोणती जागा लढवायची याचा निर्णय होईल,`` असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com