अतुल भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री फडणविसांची भेट

अतुल भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री फडणविसांची भेट

कराड : विधानसभा निवडणुकीत भाजपला  मिळालेल्या यशाबद्दल तसेच निवडणूक काळात दिलेल्या  पाठबळाबद्दल कराड दक्षिण चे भाजपचे उमेदवार  अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेवून आज आभार  मानले.

भाजपचे  प्रदेश चिटणीस  अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मधून विधानसभा निवडणूक लढवली होती.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.  अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी भाजपचे अध्यक्ष व  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सभा झाल्या.

गेल्या पाच वर्षापासून भाजपच्या माध्यमातून कार्यरत राहून तयारी केली होती. मात्र श्री. भोसले यांना आमदार चव्हाण यांच्याकडून सुमारे साडेनऊ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. श्री. भोसले यांनी  आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com