atul bhosale to contest south karad from bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

बारामतीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार 35578 मतांनी आघाडीवर
भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
कोथरुडमध्ये चंद्रकांतदादांची तर शिवाजीनगरमध्ये काँग्रेसच्या दत्ता बहिरटांची आघाडी
सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
नांदेड - भोकर मधून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे 779 मतांनी आघाडीवर
मुक्ताईनगर : चौथी फेरी भाजपच्या रोहिणी खडसें 929 ने पुढे
माहीम मतदार संघ शिवसेना सदा सरवणकर 5000 मतांनी आघाडी
चौथ्या फेरीअखेर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 25552 मताने आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

अतुल भोसले भाजपचे दक्षिण कराडमधून उमेदवार : चंद्रकांतदादांची घोषणा

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पंढरपूर :  विधानसभा निवडणुकीसाठी आणखी  वर्षभराचा अवधी असला तरी सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दक्षिण कराड मधून विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले हे भाजपचे उमेदवार असतील, अशी पंढरपुरात  घोषणा करुन विधानसभा निवडणूकींचे रणशिंग फुंकले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुमारे 80 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला.

पंढरपूर :  विधानसभा निवडणुकीसाठी आणखी  वर्षभराचा अवधी असला तरी सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दक्षिण कराड मधून विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले हे भाजपचे उमेदवार असतील, अशी पंढरपुरात  घोषणा करुन विधानसभा निवडणूकींचे रणशिंग फुंकले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुमारे 80 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना पाटील यांनी डाॅ.अतुल भोसले यांंच्या कामाचे कौतुक करुन त्यांनी कराड दक्षिण मधून निवडणूकीसाठी तयारी सुरु करावी असे  जाहीर भाषणामध्ये  सांगितले.

``डाॅ. भोसले यांना साखर कारखाना, हाॅस्पिटलसह अनेक सहकारी संस्था चालवण्याचा चांगला  अनुभव आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर राज्यातील महत्वाच्या आणि मोठ्या असलेल्या विठ्ठल मंदिर समितीची धुरा सोपवली आहे. सुरवातीला त्यांना बराच विरोध सहन करावा लागला. मात्र त्यांनी आपल्या कामातून वारकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांचे काम पाहून त्यांना आणखी मोठी जबाबदारी देण्याचा विचार मुख्यमंत्रीसाहेब करत  आहेत. यासाठी त्यांना प्रथम आमदार व्हावे लागेल. आगामी निवडणूकीसाठी त्यांना दक्षिण कराड मधून माजी मुख्यमंत्र्यांशी लढावे लागणार आहे. तेव्हा त्यांनी मतदारसंघातही आता पासूनच  चांगले लक्ष घालावे, त्यांना कोणतीही मदत लागली तर आम्ही ती  देऊ,`` अशा शब्दांत चंद्रकांतदादांनी भोसले यांचे कौतुक केले.

मंत्री  पाटील यांनीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर जाहीर सभेत अतुल भोसले यांची दक्षिण कराड मधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह  कराड येथून आलेल्या कार्यकर्त्यांनीही टाळया वाजवून स्वागत केले.  डाॅ. अतुल भोसले यांच्या रुपाने आज भाजपने आपल्या पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करुन निवडणुकींचे रणशिंग फुंकले आहे. 

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ आैसेकर महाराज, सदस्या अॅड. माधवी निगडे, संभाजी शिंदे, माजी आमदार सुधाकर परिचारक, खासदार विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख