राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

मनसे आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भेटत असल्याने नवीच राजकीय चर्चा रंगत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अतुल बेनके यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

जुन्नर : जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (गुरुवारी, ता.३१) `कृष्णकुंज` येथे सदिच्छा भेट घेतली.

सुमारे तासभर झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी किल्ले शिवनेरीवर कोणती विकास कामे करता येतील याविषयी चर्चा केली. तसेच शिवजयंतीला शिवनेरीवर येणार असल्याचे सांगितले.

ठाकरे यांच्या या भेटीमागे कोणताही राजकीय अर्थ नसला तरी बेनके यांना निवडणुकीत तालुका मनसेने जाहीर पाठींबा दिला होता. जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे व मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी बेनके यांचा प्रचार करत त्यांना निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावली असल्याने केवळ ऋणनिर्देश व्यक्त करणे हा हेतू असल्याचे समजते.

मनसेने विधानसभेत जुन्नरला उमेदवारीची मागणी केली असताना देखील उमेदवारी दिली नव्हती. मनसेच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार मनसेला सोयीस्कर रित्या विसरून गेले असल्याचे चित्र होते.  शिवसेनेत उडी घेतलेल्या आमदारांना यावेळी धडा शिकविण्याच्या मनःस्थितीत मनसैनिक असल्याची चर्चा होत होती. यामुळे तालुक्यात मनसेने उमेदवार न देता बेनके यांना पाठींबा देऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सुप्त इच्छा पूर्ण केली असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी त्यांच्या समवेत मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातेले, केशव काळे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, तालुका अध्यक्ष साईनाथ ढमढेरे, विकास मोरे, नंदकिशोर जगताप, शिवा बनसोडे, शाम काचळे, आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com