अतुल बेनके यांनी पाच हजार तरुणांना रोजगार दिला

अतुल बेनके यांनी पाच हजार तरुणांना रोजगार दिला

नारायणगाव : आघाडीचे उमेदवार अतुल बेनके हे उच्च शिक्षित आहेत. तरुणांना योग्य दिशा, शेतीला पाणी, शिक्षण, आरोग्याच्या योग्य सुविधा, तरुणांना रोजगार देण्याची क्षमता बेनके यांच्यातच आहे. मागील पाच वर्षात नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी सुमारे पाच हजार तरुणांना रोजगाराची संधी दिली आहे. विधानसभेची निवडणूक तालुक्‍याला दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. सर्वांगीण विकासासाठी बेनके यांना संधी द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांनी दसरा मेळाव्या निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त शिवशाहीर प्रा.प्रवीण जाधव यांनी पोवाडे सादर केले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस व मित्र पक्षाचे जुन्नर विधान सभेचे उमेदवार अतुल बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, दशरथ पवार, तुळशीराम भोईर, बाजीराव ढोले, सीताराम खिलारी, विजय कुऱ्हाडे, भाऊ देवाडे, सुरेखा वेठेकर, अलकाताई फुलपगार, अनघा घोडके, गणपत कवडे, देवराम मुंढे, शिरीष बोऱ्हाडे आदि उपस्थित होते.


लेंडे म्हणाले, ``सत्ता नसताना बेनके यांनी मागील पाच वर्ष तालुक्‍यातील जनतेला रस्ते,पाणी,वीज, आरोग्य सुविधा,नुकसान भरपाई मिळावी म्हणून संघर्ष केला. नोकरी महोत्सवाचे आयोजन करुण 69 कंपन्यांमध्ये उच्च शिक्षित तरुणांना रोजगाराची संधी मिळवून दिली. अपघातग्रस्त कुटुंबीयांना मदत केली. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या साठी आंदोलन केले.पुणे नाशिक महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रयत्नामुळे सुमारे 58 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. कुकडीचे पाणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना प्राधान्याने मिळावे यासाठी आंदोलने केली.

``तालुक्‍याचा सर्वांगीण विकास करण्याची दृष्टी बेनके यांच्यातच आहे.मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता बेनके यांच्या सारख्या सुक्षिशीत तरुणाला संधी द्यावी.बेनके म्हणाले मागील पाच वर्षात तालुक्‍यातील जनतेला आरोग्य, पाणी,वीज,शेतमालाचे बाजारभाव,अतिवृष्टी,दुष्काळ आदि समस्यांचा सामना करावा लागला. आदिवासी भागात भात पिकांचे तर मध्य व पूर्व भागात द्राक्ष,टोमॅटो या प्रमुख पिकांचे अतिवृष्टीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्यांना एक रुपयांचे अनुदान मिळाले नाही. पीक विम्याची रक्कम कंपन्यांनी हडप केली.कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना आक्रोश करावा लागला. पाण्यासाठी केलेल्या आंदोलनाची दखल घेण्या ऐवजी लोकप्रतिनिधींनी चेष्टा केली. गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.एकाही तरुणाला मागील पाच वर्षात रोजगार देण्याचा प्रयत्न केला नाही. असा लोकप्रतिनिधी तरुणांना व शेतकऱ्यांना न्याय देवू शकणार नाही अशी जनतेची धारणा झाली आहे,`` असे लेंडे यांनी सांगितले.

आभार पांडुरंग पवार यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com