attack on sandeep patil story | Sarkarnama

...म्हणून साताऱ्याचे SP संदीप पाटील वाचले! 

उमेश बांबरे 
बुधवार, 25 जुलै 2018

आंदोलक युवकांकडून महामार्गाच्या दोन्ही बाजूने दगडफेक सुरू असताना एक दगड पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे भिरभिरत आला. त्यांना दगड लागू नये, असा प्रयत्न काहींनी केला तरीही तो त्यांच्या पोटावर बसला. परिणामी पाटील यांना गंभीर इजा झाली नाही. 

सातारा : आंदोलक युवकांकडून महामार्गाच्या दोन्ही बाजूने दगडफेक सुरू असताना एक दगड पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे भिरभिरत आला. त्यांना दगड लागू नये, असा प्रयत्न काहींनी केला तरीही तो त्यांच्या पोटावर बसला. परिणामी पाटील यांना गंभीर इजा झाली नाही. 

महामार्गावर रास्ता रोको सुरू असताना पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे व महामार्गावरून खाली जाण्याचे आवाहन केले. पण आंदोलक अधिकच आक्रमक झाले व त्यांनी पोलिस व्हॅनला लक्ष्य करत दगडफेक केली. यावेळी व्हॅनजवळ पोलिस अधीक्षक संदीप पाटील, त्यांचा अंगरक्षक संदीप इंगवले, तसेच पोलिस कर्मचारी थांबले होते. 

अचानक दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांनी तसेच तेथे उपस्थित पत्रकारांनी पाटील यांनी दगड लागू नयेत, असे प्रयत्न केले. त्यांना अजंठा चौकाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुफान दगडफेक सुरूच होती. यातील एक दगड पाटील यांच्या दिशेने आला. पण तो पाटील यांच्या पोटावर बसला. तो दगड डोक्‍यात लागला असतरातर अन्यथा ते गंभीर जखमी झाले असते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख