ATS raids sudhanva's house in Satara | Sarkarnama

सुधन्वाच्या साताऱ्यातील घरी एटीएसचा छापा

सरकारनामा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मंगळवारी सायंकाळी  सातार्‍यात एटीएस पथक दाखल झाले. त्यांनी पाच वाजता सुधन्वा याचा करंजे येथील  घरावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी पोलिसांनी काही महत्वाचीकागदपत्रे व वस्तू सापडल्या असून त्या जप्‍त केल्या आहेत.

सातारा : नालासोपारा येथील शस्त्रसाठा प्रकरणी एटीएस पथकाने अटक केलेल्या संशयित सुधन्वा गोंधळेकर  याच्या  साताऱ्यातील करंजे येथील घरी मंगळवारी सायंकाळी छापा टाकुन तपासणी केली.  रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती या मध्ये काही महत्वाची कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत. तसेच त्याच्या कुटुंबाकडेही चौकशी केल्याचे समजते आहे.

नालासोपारा येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्या प्रकरणी एटीएस पथकांनी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर याना अटक केली होती. त्यानंतर पुणे, सोलापूर, औरंगाबाद व सातारा शहरासह अन्य ठिकाणाहून 12 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

शुक्रवारी नालासोपारा येथे हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असणारा वैभव राऊत याच्या घरी मुंबई एटीएसने छापा टाकल्यानंतर गावठी बॉम्बसह बॉम्ब बनवणारे साहित्य सापडले होते.  एटीएस पोलिसांनी वैभव याच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यात सुधन्वा गोंधळेकर (मूळचा  करंजे, सातारा ) याचे नाव समोर आलेे. सुधन्वाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने शस्त्रास्त्रे ठेवल्याची ठिकाणे सांगितली होती. त्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी शस्त्र साठा जप्त केला होता. 

गेले पाच दिवस मुंबई एटीएस मुंबईसह पुणे, सोलापूर, औरंगाबाद येथे लक्ष ठेवून छापासत्र टाकत होते. पण एटीएस पथकाने साताऱ्यात छापा सत्र राबवले नव्हते.  पण काल मंगळवारी सायंकाळी  सातार्‍यात एटीएस पथक दाखल झाले. त्यांनी पाच वाजता सुधन्वा याचा करंजे येथील  घरावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी पोलिसांनी काही महत्वाचीकागदपत्रे व वस्तू सापडल्या असून त्या जप्‍त केल्या आहेत. यानंतर पोलिसांनी सुधन्वा याच्या कुटुंबियांकडेही चौकशी केली ती रात्री उशीरापर्यंत सुरू होती. यावेळी करंजे येथील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख