सेना- भाजपनेच सरकार स्थापन करावे : पवार व आठवलेंचा सल्ला

 सेना- भाजपनेच सरकार स्थापन करावे : पवार व आठवलेंचा सल्ला

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीनंतर पवार यांनी युतीने सरकार स्थापन करावे जनतेने त्यांना जनादेश दिला आहे असा सल्ला दिला. राज्यातील सरकार स्थापने संदर्भातला पेच संपावा यासाठी आठवले यांनी माझी भेट घेतली, त्यांनी मला सल्ला विचारला माझा हाच सल्ला आहे असे पवार यांनी स्पष्ट केले. 

आठवले यांनी पवार यांची भेट घेतल्यावर आज दोघांची एकत्र पत्रकार परिषद झाली त्यात आपण पवार यांची का भेट घेतली ते आठवले यांनी सांगितले, तर पवार यांनी आठवले यांचे कौतुक करून आठवले यांनी पेच सुटण्यासंदर्भात प्रयत्न करावेत असे आवाहन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com