atalbihari vajpeyi nagar tour | Sarkarnama

वाजपेयी नगरमध्ये म्हणाले होते, 'मेरा भी खून लिजिए..' 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नगरपालिकेच्या रक्तपेढीच्या उदघाटनावेळी डॉक्‍टरांना बोलताना वाजपेयी म्हणाले होते,'मेरा भी खून लिजिए'! 

नगर :अटलबिहारी वाजपेयी यांची नगरला सभा झाली होती. त्यांच्या निधनाने नगरकरांनी या आठवणी जागविल्या. 

खासदार दिलीप गांधी म्हणाले, 24 एप्रिल 1986 रोजी नगर जिल्ह्याच्या वतीने त्यांना 11 लाख रुपयांचा गौरव निधी दिला. त्यानिमित्त खूप मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी नगरपालिकेच्या रक्तपेढीचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. कोनशिला अनावरण व फित कापून त्यांनी उदघाटन केले. त्या वेळी ते डॉक्‍टरांना म्हणाले, मेरा भी खून लिजिए... त्या वेळी मी भाजपा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष होतो. 21 जानेवारी 2004 मध्ये मी मंत्रीपदाची शपथ त्यांच्या उपस्थितीत घेतली होती. 

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड म्हणाले, वाजपेयी यांचे वकृत्त्व खूपच भावले होते. नगरमधील सभेनंतर त्यांच्या नाश्‍त्याची व्यवस्था दीक्षित मंगल कार्यालयात केली होती. त्या वेळी तत्कालिन कार्यकर्ते राजाभाऊ झरकर, सूर्यभान वहाडणे, श्री. दीक्षित आदी मान्यवरांनी वाजपेयी यांचे स्वागत केले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख