atalbihari vajpeyi and suresh prabhu story | Sarkarnama

वाजपेयींनी सुरेश प्रभुंसाठी आडवाणींना बाळासाहेब ठाकरेंकडे पाठवले होते! 

शिवप्रसाद देसाई 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

वाजपेयी यांची प्रभू हेच कॅबिनेटपदी रहावे अशी इच्छा होती. त्यांनी तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाठविले. शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद देण्याची तयारी त्या काळात दर्शवण्याचे संदर्भही दिले जातात; पण या चर्चेत मार्ग निघाला नसल्याने प्रभूंसाठी वाजपेयींनी विशेष कॅबिनेट दर्जाचे पद तयार केले. त्यांना नद्या जोड प्रकल्पाचे प्रमुख बनविले गेले. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कोकण भेटीचे संदर्भ फार कमी आहेत; पण कोकणच्या बौद्धीक क्षमतेचा देशहितासाठी वापर करण्याची विशालता दाखवल्याचे त्यांच्या व सुरेश प्रभू यांच्या नात्यावरून ठळक दिसते. 

श्री. प्रभू शिवसेनेतून राजापूर मतदार संघातून लोकसभेत गेले. वाजपेयींच्या पहिल्या 13 दिवसाच्या सरकारपासून ते कॅबिनेटमध्ये होते. मित्रपक्षाचे खासदार असूनही वाजपेयींनी क्षमता ओळखून त्यांच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या सोपवल्या. 2000 मध्ये मात्र शिवसेनेने आपल्या मंत्रीपदाबाबत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी श्री. प्रभू उर्जामंत्री होते.ऊर्जा क्षेत्रात त्यांनी बरेच मोठे बदल केले होते. अगदी त्याकाळात उर्जा क्षेत्रातील बदलांसाठी या खात्याच्या सचिवपदी याक्षेत्रातील तज्ज्ञाची गरज असल्याचा आग्रह प्रभूंनी धरला. त्यांची विनंती मानून वाजपेयींनी देशाच्या इतिहासात प्रथमच नॉन आयएएस ऊर्जा सचिव नियुक्त केले. 

उर्जामंत्री असताना शिवसेनेने श्री. प्रभू यांनी राजीनामा द्यावा, असा आदेश काढला. त्यावेळी वाजपेयी यांची प्रभू हेच कॅबिनेटपदी रहावे अशी इच्छा होती. त्यांनी तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाठविले. शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद देण्याची तयारी त्या काळात दर्शवण्याचे संदर्भही दिले जातात; पण या चर्चेत मार्ग निघाला नसल्याने प्रभूंसाठी वाजपेयींनी विशेष कॅबिनेट दर्जाचे पद तयार केले. त्यांना नद्या जोड प्रकल्पाचे प्रमुख बनविले गेले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

फोटो फीचर

संबंधित लेख