atal study center in all univercity mungantivar | Sarkarnama

राज्यातील सर्व विद्यापिठांत होणार "अटल अध्यासन केंद्राची' स्थापना : मुनगंटीवार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई ः राज्यातील सर्व विद्यापीठांत अटल अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात येणार असून यासाठी राज्य सरकार सुरवातीला 20 कोटी रुपये इतका निधी खर्च करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिली. 

मुंबई ः राज्यातील सर्व विद्यापीठांत अटल अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात येणार असून यासाठी राज्य सरकार सुरवातीला 20 कोटी रुपये इतका निधी खर्च करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिली. 

माजी पंतप्रधान, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे महान नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी (ता.22) मुंबईत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे नवी दिल्ली येथून अटलजींचा अस्थी कलश मुंबईत आणणार असून राज्यातील विविध नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. 

भाजप प्रदेश कार्यालया आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रवक्ते गणेश हाके व अतुल शाह उपस्थित होते. 

मुनगंटीवार म्हणाले "" अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत नरिमन पॉइंट येथे एनसीपीए सभागृहात सायंकाळी 6 वाजता सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह नेते अटलजींविषयीच्या भावना व्यक्त करतील. विविध क्षेत्रातील मान्यवरही सभेत सहभागी होतील. मुंबईतील राज्यस्तरीय सभेप्रमाणे राज्यात विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. 

त्यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार अटलजींचा अस्थी कलश नवी दिल्ली येथून आणणार आहेत. बुधवारी दुपारी चार वाजता अटलजींचा अस्थी कलश मुंबईत विमानतळावर आणण्यात येईल. 

महाराष्ट्रातील विविध नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली येथे नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख