राज्यात अटल आनंदवन योजना; विभागीय वृक्षलागवड आढावा बैठकीत मुनगंटीवार यांची माहिती

जपानमधील मियाबाकी जंगलाच्या धर्तीवर प्राणवायूचे शाश्‍वत ठिकाण तयार करण्यासाठी राज्यात नगर परिषद, महापालिकांच्या मोकळ्या जागांवर लवकरच अटल आनंदवन योजना आणली जाणार आहे. त्यात शास्त्रोक्त पद्धतीने एका एकरात दहा ते बारा हजार झाडे जगवून 13 टक्के वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यावर भर देणार आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.
राज्यात अटल आनंदवन योजना; विभागीय वृक्षलागवड आढावा बैठकीत मुनगंटीवार यांची माहिती

नाशिक : जपानमधील मियाबाकी जंगलाच्या धर्तीवर प्राणवायूचे शाश्‍वत ठिकाण तयार करण्यासाठी राज्यात नगर परिषद, महापालिकांच्या मोकळ्या जागांवर लवकरच अटल आनंदवन योजना आणली जाणार आहे. त्यात शास्त्रोक्त पद्धतीने एका एकरात दहा ते बारा हजार झाडे जगवून 13 टक्के वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यावर भर देणार आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. 

विभागीय वृक्षलागवड आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. खासदार डॉ. भारती पवार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त राजाराम माने, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक टी. के. चौबे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके आदींसह विविध जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते. 

मुनगंटीवार म्हणाले, की लोकसहभागातून झाडांच्या संवर्धनासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समिती स्थापण्याचा निर्णय घेतला. समितीवर आराखडा तयार करून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी असेल. रानमळा पद्धत, कन्यावन समृद्धी योजनांची माहिती दिली जावी. हरितसेनेच्या पर्यावरणप्रेमींचा सहभाग वाढवत वृक्षसंवर्धनासाठी 12 हजार 665 गावांत संयुक्त वन समित्यांची स्थापना करण्यात आली. हरितसेनेच्या माध्यमातून एक कोटी स्वयंसेवक नोंदीचे प्रयत्न सुरू आहेत. 

खारगे यांनी, वृक्षलागवडीत पारदर्शकतेसाठी संकेतस्थळावर लावलेल्या रोपांची माहिती अपलोड करावी. जिल्हा परिषदांनी कन्या समृद्धी योजनेचा प्रसार करताना विविध आढावा बैठकांच्या शेवटी वृक्षसंवर्धनाच्या चर्चेची सूचना केली. विभागीय आयुक्तांनी विभागात पाच कोटी 82 लाख वृक्षलागवडीसाठी सहा कोटी 85 रोपे आणि पाच कोटी चार लाख खड्डे तयार असल्याचे सांगितले. सात लाख 95 हजार हरितसेनेची नोंद झाल्याचे सांगितले.

- नगरला वृक्षलागवडीसाठी साखर कारखान्यांची मदत 
- धुळ्यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग उत्साहवर्धक
- जळगावला रोटरी, जैन इरिगेशनसोबत त्रिपक्षीय करार
- कोठली खुर्द (ता. नंदुरबार) सघन वृक्षलागवड 
- नंदुरबारला 22 गावांत स्वयंसेवी संस्थांतर्फे लागवड
- नाशिकला देवराई उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- मधमाश्‍या, पक्ष्यांसाठी उपयुक्त प्रजाती लावाव्यात

विभागाची स्थिती (क्षेत्र चौरस किलोमीटर)
जिल्हा भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित क्षेत्र टक्केवारी

नाशिक 15530 1068 6.88
नगर 17068 270 1.58
जळगाव 11765 1144 9.72
धुळे 7195 308 4.28
नंदुरबार 5995 1192 20.02

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com