asududdin owaissi criticise chandrababu naidu | Sarkarnama

चंद्राबाबू, आता मी आंध्र प्रदेशात येतोय!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

ओवैसींच्या पक्षाचे 7 आमदार निवडून आले आहेत.

पुणे: तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर एआयएमआय पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'चंद्राबाबू, आता मी आंध्र प्रदेशात येतोय', असे आव्हान त्यांनी दिले आहे. 

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ओवैसी यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या के. चंद्रशेखर राव (KCR) यांना पाठिंबा दिला आहे. निकालाच्या पुर्वसंध्येला ओवैसी यांनी राव यांची बुलेटवर जावून भेट घेतली होती. भेटीनंतर के. चंद्रशेखर राव हे भक्कम बहुमत मिळवतील आणि काँग्रेस- टीडीपी युतीचा सफाया होईल, असा दावा केला होता. 

त्यानंतर आज ओवैसींच्या अपेक्षेनुसार निकाल आले. के. चंद्रशेखर राव यांनी एकतर्फी सत्ता मिळवली, तर चंद्राबाबू नायडूंना फक्त 2 जागा मिळाल्या. त्यामुळे ओवैसी भलतेच खुशीत आहेत.

पत्रकारांशा बोलताना ओवैसी म्हणाले, चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशमधून तेलंगणात आले होते. प्रचंड पैसा ओतून सभा घेतल्या, मात्र जनतेने त्यांना पुर्णपणे नाकारले. चंद्राबाबूंनी आमच्याविरूद्ध प्रचार केला, पण काही उपयोग झाला नाही. आता मी आंध्र प्रदेशात येतोय, हे त्यांनी लक्षात ठेवावे. लोकसभेच्या 25 पैकी 2 जागाही त्यांना मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख