AstikKumar Pandey Took Charge As Aurangabad Municipal Commissioner | Sarkarnama

आयुक्त पांडेय याचे स्वागत नगररचना अधिकाऱ्याला पडले पाच हजारात

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 डिसेंबर 2019

अस्तीक कुमार पांडये औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून आज रुजू झाले . या निमित्ताने सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी एका अधिकाऱ्याला प्लास्टिकच्या आवरणातील पुष्पगुच्छ दिल्याबद्दल आयुक्तांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आज सूत्रे स्वीकारली, तेव्हा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे नगररचना विभागप्रमुख यांना चांगलेच महागात पडले. प्लास्टिकच्या आवरणातील बुके दिल्याने आयुक्तांनी त्यांना जागेवर 5 हजार रुपयांचा दंड केला. त्यामुळे नव्या आयुक्तांची भविष्यात काम करण्याची पध्दत कशी असेल याची प्रचिती महापालिका अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी आली.

अस्तीक कुमार पांडये औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून आज रुजू झाले . या निमित्ताने सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहाय्यक संचालक नगररचना  आर. एस .महाजन देखील  आयुक्तांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन गेले.

आयुक्तांनी त्यांचे स्वागत आणि पुष्पगुच्छ तर स्वीकारला. पण दुसऱ्याच क्षणाला महाजन यांना बुकेला प्लास्टिक वापरले असल्यामुळे जागेवर पाच हजार रुपये दंड केला. वरिष्ठ लिपिक अनिल बोनडे यांनी महाजन यांच्याकडून 5000 रुपय दंड वसूल करून पावतीही दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख