महापालिका आयुक्त म्हणाले...तलावात बुचकळून काढीन ! 

यावेळी एकाने जागेची मालकी माझीच असल्याचा दावा केला. त्यावर भडकलेल्या आयुक्तांनी 'निकलो एहांसे, नही तो यही पानीमे डुबाके निकालूंगा'; अशा शब्दात इशारा दिला.
astik-pande
astik-pande

औरंगाबाद :  ऐतिहासिक सलीम अली सरोवर परिसराला अतिक्रमणांचा वेढा पडत असल्याने महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण सरोवराची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी (ता. 11) महापालिका आयुक्तांनी सरोवराची पाहणी केली. 


यावेळी एकाने जागेची मालकी माझीच असल्याचा दावा केला. त्यावर भडकलेल्या आयुक्तांनी 'निकलो एहांसे, नही तो यही पानी  मे डुबाके निकालूंगा'; अशा शब्दात इशारा दिला.

शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवराला चारही बाजूंनी अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. अनेकांनी तलावात भराव टाकून चौपाटी तयार केली आहे. टवाळखोर तलाव परिसरात येऊन पार्ट्या करणे, मासेमारी करणे, असे प्रकार करत आहेत.


 यासंदर्भात दैनिक  सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने सूमोटो याचिका दाखल करून घेतली. याचिका सुनावणीस आली असता, महापालिकेला उपाय-योजना करण्याचे आदेश देण्यात आले होते. 


यावेळी अमॅकस क्‍यूरी म्हणून ऍड. नेहा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. उपाय-योजनेसंदर्भात शनिवारी ऍड. कांबळे यांच्यासह आयुक्त आस्तिकुमार पांडेय, उपायुक्त रवींद्र निकम, सुमंत मोरे, शहर अभियंता सखाराम पानझडे, विधी सल्लागार अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी पाहणी केली.


 तलाव परिसरात किती अतिक्रमणे झाले आहेत, हे तलावाच्या सीमा निश्‍चित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे न्यायालयाने तलावाची मोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेकडे रेकॉर्ड नसेल तर गुगल नकाशाव्दारे तलावाची मोजणी करा, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे लवकरच तलावाची मोजणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

आयुक्तांचा संताप अनावर
अतिक्रमण रोखण्यासाठी दिल्लीगेटच्या बाजूने जळगाव रोडवर तारेचे कुंपण केले जात आहे. या कामाला विरोध करत एकाने आयुक्तांना गाठले व माझ्याकडे जागेची मालकी कागदपत्र आहेत, असा दावा केला. 
एकीकडे अतिक्रमणांवर प्रतिबंध घातले जात असताना, जागेच्या मालकी सांगणारा समोर आल्याने आयुक्त पांडेय संतापले. त्यांनी संबंधिताला "निकलो यहॉं से नही तो, पानी  डुबाके निकालूगां' पोलिसांनो याला उचला, असे म्हणत हुसकावून लावले. कोण काय दावे करतील याचा नेम नही. हा कसा काय दावा करतो? असा प्रश्‍न आयुक्तांनी महापालिका अधिकाऱ्यांना यावेळी केला.

चारही बाजूंनी तारेचे कुंपण
तलावाचे मुख्य प्रवेशव्दार असले तरी अनेक भागातून टवाळखोर सरोवर परिसरात प्रवेश करतात. त्यामुळे न्यायालयाने चारही बाजूंनी तारेचे कुंपण घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तलाव परिसरात कचरा फेकणाऱ्यांचा बंदोबस्त करा, टवळखोरांचा वावर थांबवा असेही आदेश दिल्याने महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात उपाय-योजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com