पुणे जिल्हाधिकारीपदासाठी आस्तिक पांडे की बिपीन शर्मा ? - Astik Pande & Vipin sharma in a race for Pune collector | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे जिल्हाधिकारीपदासाठी आस्तिक पांडे की बिपीन शर्मा ?

मृणालिनी नानिवडेकर : सरकारनामा 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदासाठी आस्तिककुमार पांडे किंवा बिपीन शर्मा यांचे नाव चर्चेत आहे.

मुंबई  :  महापालिकेचे आयुक्‍त कुणालकुमार यांची दिल्लीत बदली झाल्याने पुण्यातील त्यांच्या रिक्‍त जागी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्‍ती होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.

आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदासाठी आस्तिककुमार पांडे किंवा बिपीन शर्मा यांचे नाव चर्चेत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्यावर पुण्याची जबाबदारी सोपवली जाईल असे मानले जात होते आता मात्र  पांडे आणि शर्मा ही नावेही चर्चेत आल्याचे समजते. 

 आस्तिक कुमार पांडे हे सध्या अकोल्याचे जिल्हाधिकारी असून त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे ,  बिपीन शर्मा सध्या पुण्यातच कौशल्य विकास खात्याचे आयुक्त आहेत . त्यांनी यापूर्वी साखर आयुक्त म्हणूनही काम केलेले आहे .  तिन्ही अधिकारी अत्यंत कार्यक्षम म्हणुन ओळखले जातात.पुणे शहरात अनेक योजना सध्या सुरू असल्याने पुण्याचा कारभारी कोण याबददल उत्सुकता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख