IAS jitendra dudi
IAS jitendra dudi

जुन्नरच्या अतिउत्साही `अतुल`नीय नेत्यांना सहायक जिल्हाधिकाऱ्यांची चपराक!

अतिउत्साही नेत्यांमुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची भीती होती.

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्याही लोकप्रतिनिधीस नाही असे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यामुळे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींना चपराक दिली असल्याची चर्चा रंगत आहे.

सरकारच्या निर्णयानुसार अत्यावश्यक सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व वाहतूक सुरू राहणार आहे.  सोशल मीडियावर व्हायरल  व्हिडीओवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल करू नयेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते व प्रशासनाला उपाययोजना करण्यात अडथळा निर्माण होत असल्याने  असे व्हिडिओ व्हायरल केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. व्हायरल व्हिडिओ मध्ये असलेल्या कोणत्याही बाबीला कायदेशीर आधार नाही. पेट्रोल पंप बंद करण्याचा आदेश देण्यात आलेला नाही. अत्यावश्यक सुविधांसाठी पेट्रोल देण्याचा अधिकार आहे. खाजगी कामासाठी जाणाऱ्या वाहनांना पेट्रोल देऊ नये आशा सूचना देण्यात आल्या आहेत. किराणा माल व मेडिकल दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचा नियम पाळावा. होम क्वारटाईन केलेल्या व्यक्तींनी घरातच थांबावे बाहेर फिरताना दिसल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील सर्व प्रमुख नेते मंडळीच्या बैठकीत जुन्नर तालुका शंभर टक्के लॉक डाऊन करण्याच्या निर्णय झाला होता. मात्र यात भाजीपाला व शेतमालाच्या गाड्या मुंबई व पुण्याला नेता येणार नाही या मुद्यावरून वादविवाद निर्माण होऊन उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या या सर्व चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे.

जुन्नर तालुक्यात डिंगोरे येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तालुका १०० टक्के लॉकडाऊन करत, तालुक्यातून एकही वाहन भाजीपाला, दूध, अंडी बाहेर जाणार नाही, असा निर्णय सर्व पक्षिय नेत्यांनी घेतला असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी समाजमाध्यमांद्वारे जाहीर केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com