Assembly work stopped for today | Sarkarnama

विधानसभेत सत्ताधारी आमदारांसह विरोधकांचा प्रचंड गोंधळ  विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

ब्रह्मदेव चट्टे : सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई: विधानसभेत आज पाचव्या दिवसाचे कामकाजाला गोंधळाने सुरवात झाली.  सत्ताधारी भाजप सेनेच्या आमदारांसह विरोधक कर्जमाफीची मागणी विरोधकांकडून जोरात करण्यात आली.

यावेळी सर्व पक्षीय आमदार प्रचंड आक्रमकपणे कर्जमाफीची मागणी करत होते. प्रचंड गदारोळात प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला. मात्र कर्जमाफीच्या मागणीसाठी सर्व पक्षीय आमदार वेलमध्ये उतरल्याने दोनदा आर्ध्यासाठ कामकाज तहकूब करण्यात आले.

 त्यानंतर कामकाजाल सुरवात होताच कामकाज सल्लागार समितीच्या शिफारसी आणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा धन्यावाद प्रस्ताव गोंधळातच मंजूर करण्यात आला. गोंधल वाढत असल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

विधानसभे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधक व सेनेच्या आमदारांनी परिसर कर्जमाफीच्या घोषणांनी दणाणून सोडला. कोण म्हणतयं देत घेतल्याशिवाय राहत नाय, अरेसया सरकारचे करायचे काय  मुंडकं वर पाय, मोदी सरकार हाय हाय, भगवे सरकार हाय हाय, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.

आजच्या कामाकाजा दरम्यान विरोधकांसह सेना आमदारांनी कर्जमाफीची घोषणा लावून धरली.  त्यावेळी विरोधकासह सेना भाजप आमदारही वेलमध्ये उतरले होते. काही आमदारांनी अध्यक्षांच्या समोर डायसवर चढण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीच्या मागण्या करणारा फलकच सचिवांच्या आसनासमोर लावला होता. कामाकाजात वाढता गोंधळ अन् घोषणाबाजीमुळे  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज अर्धा तास स्थगित केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख