राधानगरी अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गतीने होणार

पुनर्वसन प्रक्रिया गेली कित्येक वर्ष प्रलंबित असल्याकडे श्री. अबीटकर यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.
राधानगरी अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गतीने होणार

कोल्हापूर : राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती देणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत आमदार प्रकाश अबीटकर यांनी विचारलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य ची निर्मिती 1985 रोजी च्या अधिसूचनेनुसार करण्यात आली. या अभयारण्यामध्ये राधानगरी तालुक्‍यातील 28 गावे व गगनबावडा तालुक्‍यातील 1 गाव अशी 29 गावांचा समावेश आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 24 (2) (सी) अंतर्गत राधानगरी व गगनबावडा तालुक्‍यातील 11 महसुली गावांमधील 30 वाड्या-वस्त्यांतीळ एकूण 1499 खातेदारांची पुनर्वसन प्रक्रिया गेली कित्येक वर्ष प्रलंबित असल्याकडे श्री. अबीटकर यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील प्रामुख्याने अभयारण्या मध्ये समाविष्ट असणाऱ्या महसुली गावे व वाड्यावर त्यांचे पुनर्वसन जलद गतीने करणे पुनर्वसनासाठी संकलन व मूल्यांकन करण्याच्या वेळी 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस पुनर्वसन पॅकेजचा लाभ देणे ते एजिवडे व न्यू करंजे येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी व घरे शासनाला दानपत्रे देऊनही अद्याप त्यांच्या घरांचा मूल्यांकनाची रक्कम मिळालेली नाही ती त्वरित मिळावी, अशी मागणीही श्री. अबीटकर यांनी केली. 

याला उत्तर देताना वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाची प्रक्रिया जरी संथ गतीने सुरू असले तरी पुनर्वसनाची प्रक्रिया गती वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com