तयारी विधानसभेची : बारामतीत अजितदादांच्या विरोधात कोण? इंदापूर काँग्रेसकडेच राहणार?

बारामतीत चमत्कार घडण्याची अपेक्षा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते आहे. भाजपने बारामतीत यंदा प्रथमच जोर लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बारामतीत विधानसभेसाठी अजित पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे निश्‍चित आहे, मात्र त्यांच्या विरोधात यंदा कोणाला संधी मिळते हे मात्र अस्पष्ट आहे.
तयारी विधानसभेची : बारामतीत अजितदादांच्या विरोधात कोण? इंदापूर काँग्रेसकडेच राहणार?

लोकसभेच्या बारामती मतदारसंघांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड ,पुरंदर, भोर व खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे व भाजपच्या कांचन कुल यांच्यात मुख्य लढत झाली . यावेळी बारामतीत चमत्कार घडण्याची अपेक्षा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते आहे. भाजपने बारामतीत यंदा प्रथमच जोर लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बारामतीत विधानसभेसाठी अजित पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे निश्‍चित आहे, मात्र त्यांच्या विरोधात यंदा कोणाला संधी मिळते हे मात्र अस्पष्ट आहे. 

इंदापुरमध्ये दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असले तरी त्यांच्यासह प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे राष्ट्रवादीकडून तर कॉंग्रेसकडून हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. आघाडी झाल्यास सदरची जागा ही राष्ट्रवादी स्वतःकडे ठेवणार की कॉंग्रेसला देणार याबाबत सर्वाधिक औत्सुक्‍य आहे. दौंडमध्ये रमेश थोरात यांच्यासह अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतील मताधिक्‍यावर राष्ट्रवादीची दौंडची गणिते अवलंबून असतील. भाजपकडून वासुदेव काळे इच्छुक आहेत. विद्यमान आमदार राहुल कुल राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभा लढवणार की भाजपचे कमळ हाती घेणार हे अस्पष्ट आहे. 

भोरमध्ये कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यासह राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, शिवसेनेकडून कुलदीप कोंडे तर भाजपकडून प्रदीप खोपडे इच्छुक आहेत. मात्र भोरमध्ये बंडखोरीची शक्‍यता वर्तवली जात आहे. मुळशी मधूनही अनेक जण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. भोरमधून मागील वेळी शिवसेनेतून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार शरद ढमाले यांनी भाजपमधून निवडणूक लढविली होती. युती झाल्यास ते स्वगृही परत जाणार की भाजपमध्ये राहणार हेही पाहावे लागेल. 

पुरंदरमध्ये विद्यमान मंत्री विजय शिवतारे आमदार आहेत. तर कॉंग्रेसकडून संजय जगताप, राष्ट्रवादीकडून जालिंदर कामठे , संभाजी झेंडे ,दिगंबर दुर्गाडे ,सुदाम इंगळे यांच्या नावाची चर्चा आहे . अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना थेट जाहीर आव्हान दिले असल्याने राष्ट्रवादी पुरंदरमध्ये लोकसभेचा हिशेब चुकता करेल अशी शक्‍यता आहे. खडकवासल्यात भीमराव तापकीर भाजपचे आमदार आहेत, यंदा रमेश कोंडे सेनेकडून तर राष्ट्रवादीकडून विद्यमान व माजी अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. 

असा आहे राजकीय पट 
- बारामतीत राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची उमेदवारी निश्‍चित 
- इंदापुर मध्ये हर्षवर्धन पाटील की राष्ट्रवादीचा उमेदवार याबाबत उत्सुकता 
- पुरंदर मध्ये संजय जगताप यांना संधी की राष्ट्रवादीचा उमेदवार याबाबत उत्सुकता 
- खडकवासल्याला राष्ट्रवादीचा जोर लावणार 
- दौंडमध्ये राहुल यांचा पराभव करण्यासाठी मोर्चेबांधणी होणार . 
- भोरमध्ये बंडखोरीची शक्‍यता अधिक. 

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक
राष्ट्रवादी कॉंग्रेस - अजित पवार ,दत्तात्रय भरणे ,प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, रणजित शिवतरे ,विक्रम खुटवड ,जालिंदर कामठे,संभाजी झेंडे, दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, रमेश थोरात, आप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे ,विरधवल जगदाळे, आत्माराम कलाटे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, सुरेश हुलावळे, सविता दगडे
भाजप -भीमराव तापकीर , वासुदेव काळे, प्रदीप खोपडे, नानासाहेब शेंडे, तानाजी थोरात, बाबासाहेब चवरे, मारुतराव वणवे, शरद ढमाले
शिवसेना- विजय शिवतारे, संजय काळे, नितीन कदम , राजेंद्र काळे, कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, महेश पासलकर, राजेंद्र खट्टी, बाळासाहेब चांदेरे, दत्तात्रेय टेमघरे
कॉंग्रेस- हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, संजय जगताप. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com