विधानसभा २०१९: उत्तर महाराष्ट्र-  'महाजन-आदेश' हाच केंद्रबिंदू

नाशिक जिल्ह्यात युती व आघाडी यांच्यात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. सध्या भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी चार, असे युतीचे आठ आमदार आहेत. इगतपुरीच्या कॉंग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेत दाखल झाल्याने आघाडीचे संख्याबळ कमी झाले आहे. छगन भुजबळ यांची ताकद आघाडीसोबत असली; तरी भ्रष्टाचाराचे आरोप, तुरुंगवास यामुळे युतीच्या प्रचाराचे लक्ष्यही तेच असतील.
Girish Mahajan
Girish Mahajan

गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, कॉंग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजपप्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात कॉंग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उभं केलं आहे. आतापर्यंत आघाडी उत्तर महाराष्ट्रात, विशेषत: खानदेशात एकनाथ खडसे यांच्या डावपेचांविरोधात लढत आली. आता आघाडीचा सामना गिरीश महाजन यांच्याशी आहे. 

नाशिक जिल्ह्यात युती व आघाडी यांच्यात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. सध्या भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी चार, असे युतीचे आठ आमदार आहेत. इगतपुरीच्या कॉंग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेत दाखल झाल्याने आघाडीचे संख्याबळ कमी झाले आहे. छगन भुजबळ यांची ताकद आघाडीसोबत असली; तरी भ्रष्टाचाराचे आरोप, तुरुंगवास यामुळे युतीच्या प्रचाराचे लक्ष्यही तेच असतील. मांजरपाडा वळण योजनेने जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारे पाणी हा भुजबळांच्या प्रचाराचा मुद्दा असेल. याच भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मते प्रत्यक्ष निवडणूक निकालात निर्णायक असतील. 

जळगाव हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असल्याने इथल्या अकरापैकी अधिकाधिक जागा जिंकण्याचा गिरीश महाजनांचा प्रयत्न असेल. कित्येक दशकांनंतर सुरेश जैनांच्या अनुपस्थितीत विधानसभा निवडणूक होईल. जळगाव जिल्ह्यात बऱ्यापैकी ताकद असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न 2009 सारखे मोठे यश मिळविण्याचा असेल. कॉंग्रेसची स्थिती अगदीच तोळामासा आहे. नऊ मतदारसंघांच्या धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत मुख्य स्पर्धा कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षात असेल. रोहिदास दाजी पाटील, अमरीशभाई पटेल, स्वरूपसिंह नाईक, के. सी. पाडवी हे कॉंग्रेसचे नेते किती प्रभाव टिकवतात, यावर सारे अवलंबून असेल. 

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या खांद्यावर भाजपच्या यशाची जबाबदारी राहील. महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी भाजपच्या निवडणूक प्रचाराची दिशा बऱ्यापैकी स्पष्ट झाली असली, तरी स्थानिक मुद्देही निवडणुकीत असतीलच. विशेषत: गिरीश महाजनांच्या जलसंपदा खात्याशी संबंधित नुसतेच घोषणा झालेले तापी व गोदावरी खोऱ्यातील छोटेमोठे पाटबंधारे प्रकल्प, सतत चर्चेत राहिलेला महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर तापी मेगा रिचार्ज प्रकल्प, झालेच तर गुजरातकडे वळविले जाणारे महाराष्ट्राच्या हक्‍काचे पाणी निवडणुकीत गाजेल.

उत्तर महाराष्ट्राची 2014 ची स्थिती
एकूण जागा : 35, सर्व पक्ष स्वबळावर
भारतीय जनता पक्ष : 14. नंतर अमळनेरच्या अपक्ष आमदारांचे समर्थन
शिवसेना : नाशिक व जळगावमध्ये सात आमदार. धुळे-नंदुरबारमध्ये पाटी कोरी
कॉंग्रेस : धुळे-नंदुरबारमध्ये पाच व नाशिकमध्ये दोन विजयी. जळगावमध्ये दाणादाण
राष्ट्रवादी कॉंग्रेस : नाशिकमध्ये चार, जळगावमध्ये एक आमदार. धुळे-नंदुरबारला पडझड
माकप : कॉ. जे. पी. गावित हे प्रदेशातील पस्तिसावे आमदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com