मोदींच्या सभेनंतर विधानसभेची आचारसंहिता लागणार!

20 सप्टेंबरलाच आचारसंहिता लागेल असा दावा प्रशासनातील सुत्रांनी केला आहे.
मोदींच्या सभेनंतर विधानसभेची आचारसंहिता लागणार!

मुंबई : आचारसंहितेच्या काळजीनं महाराष्ट्रात लगबग सुरू असली तरी 19-20 सप्टेंबरला आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. तर 15 ते 18 आक्टोंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता असून 20 ते 22 दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. 

यामुळे प्रचाराचा कालावधी जेमतेम 20 ते 25 दिवसांचा राहणार असल्याने विरोधी पक्षांची दमछाक होणार असल्याचे सांगितले जाते. 

गणपती विसर्जनानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.  19 सप्टेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे समारोप होणार आहे. त्यामुळे या दरम्यान आचारसंहिता लागण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. 

दरम्यान निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात 15 ते 16 सप्टेंबर दरम्यान येणार असून त्यानंतर तीन ते चार दिवसांनी आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहित धरता 20 सप्टेंबरलाच आचारसंहिता लागेल असा दावा प्रशासनातील सुत्रांनी केला आहे. 

17 सप्टेंबर ला राज्यमंत्री मंडळाची अखेरची बैठक देखील होणार असल्याचा दावा या सुत्रांनी केला असून या बैठकीत सरसकट कर्जमाफीचा महत्वकांक्षी निर्णय होण्याचे संकेत आहेत. त्यासाठी मंत्रालय स्तरावर जोरदार हालचाली सुरू आहेत. 

पुरग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी प्रशासन व्यस्त असल्याने या भागातील कर्जाची व शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारला मिळालेला नव्हती. आता ती मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com