राष्ट्रवादी सोडणार की नाही हे तुम्ही उदयनराजेंनाच विचारा ः अजित पवार 

राष्ट्रवादी सोडणार की नाही हे तुम्ही उदयनराजेंनाच विचारा ः अजित पवार 

नागपूर : उदयनराचे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना भेटले. माझ्या माहीतीप्रमाणे पुरग्रस्तांच्या प्रश्‍नांसाठी त्यांची ही भेट होती. राष्ट्रवादी सोडून ते भाजपमध्ये जाणार की नाही, हे तुम्ही त्यांनाच विचारा, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आज म्हणाले. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान यवतमाळ येथे पत्रकारांशी ते बोलत होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या पडझडीबाबत त्यांना छेडले असता, स्वतःच्या स्वार्थाकरीता, कुणी चौकशीचा ससेमिचा चुकविण्यासाठी, तर कुणी आपल्या संस्था वाचविण्यासाठी, आर्थिक अडचणींतून मार्ग काढण्यासाठी, तर कुणी सरकारचा वरदहस्त हवा असतो म्हणून पक्ष सोडून जातात.

तो त्यांचा अधिकार आहे. जाणाऱ्याला आपण बांधून ठेवू शकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर नेते पक्ष सोडून गेल्यावर पक्षात वजाबाकी होते. पण डॉ. अमोल कोल्हेंसारखे लोक येतही असतात. त्यामुळे बेरीज सुद्धा होत असते. अशा वेळी इतर सहकारी मित्रांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करायचे असते, असेही ते म्हणाले. 

कुणाकडून जाणीव पूर्वक बातम्या पसरवल्या जातात. उमेदवारी अर्ज जाहीर करण्याच्या आधीपर्यन्त राजकीय घडामोडी सुरू राहणार आहे. आज जे पक्षाच घेत आहे, त्याना ते उमेदवारी देऊ शकणार का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

राज्यात युती झाल्यास दोघांत 288 जागा वाटल्या जाणार. भाजपचे 122 आणि सेनेचे 62 उमेदवार राहणार आहे. हा सगळा विचार केला तर पक्षांतर केलेल्याना उमेदवारी दिल्यास पक्षातील निष्ठावंत उमेदवार नाराज होतील. 

आमचे दरवाजे का बंद केले आणि ते वेगळा विचार करतील. वंचित आघाडीने कॉग्रेसला 40 जागा देऊ केल्या होत्या. आता ते 144 वर गेले आहेत. अजून बदल होतोय, अजून काही दिवस जायचे आहेत.

अजून राजकीय घडामोडी व्हायच्या आहेत. उमेदवार अर्ज दाखल करेपर्यंत कोण कुठल्या पक्षात राहील, हे सांगता येण कठीण असल्याचेही श्री पवार म्हणाले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हाध्यक्ष आमदार बेग, अमोल मिटकरी उपस्थित होतेय 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com