अश्‍विनी बिद्रे यांच्या मुलीला मुख्यमंत्री काय उत्तर देणार?

मी सहा वर्षांची असताना माझी आई सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी हिचा खून केला आणि तिचा मृतदेह वसई खाडीत फेकून दिला.
ashwini bidres daughter wrote letter to udhhav thackrey
ashwini bidres daughter wrote letter to udhhav thackrey

नवी मुंबई  : पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने माझ्या आईची हत्या करून तिचा मृतदेह वसईच्या खाडीत टाकून दिला असून माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या, अशी भावनिक मागणी मृत अश्‍विनी बिद्रे यांची मुलगी सूची गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे. 

मी सहा वर्षांची असताना माझी आई सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी हिचा खून केला आणि तिचा मृतदेह वसई खाडीत फेकून दिला. पैसे नाहीत असे कारण पुढे करुन माझ्या आईच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या, अशी मागणी सूची गोरे हिने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

हातकणंगले येथील एका शाळेत सूची सध्या इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहून आपल्याला भेट मिळावी, अशी विनंती केली आहे. या पत्रात तिने यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना आपले बाबा भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळेस मीही त्यांच्यासोबत होते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आम्ही त्यांच्या दालनात ताटकळत थांबलो होतो; मात्र ते आम्हाला भेटले नाहीत. त्यामुळे आपण मला व माझ्या बाबांना भेट द्यावी, अशा विनंतीचे व भावनिक साद सूची गोरे हिने पत्रात घातली आहे. 
 
मी बालपणातच आई गमवली आहे. आता मला बाबांना गमवायचे नाही. आई प्रमाणेच पोलिस माझ्या बाबांना मारतील का? अशी भीती मला नेहमी वाटते. माझ्या आईच्या खुन्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी माझे बाबा नेहमीच मुंबई, नवी मुंबईला न्यायालयात येत-जात असतात. अनेक वेळा मीही त्यांच्याबरोबर असते. माझे बाबा सध्या कोर्टात हरवले आहेत. माझ्या आईच्या खुन्यांना लवकर शिक्षा झाली तर ते कोर्टाऐवजी पूर्णवेळ माझ्यासोबत राहतील. आयुष्यात आईची जी उणीव निर्माण झाली आहे, ती कमी होईल, असेही सूचीने पत्रात नमूद केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com