अखेर ठाणे महापालिका सभागृहनेतेच्या खुर्चीवर अशोक वैती बसले

सभागृह नेते म्हणून कार्यरत असलेले नरेश म्हस्के यांची नुकतीच महापैारपदी निवड झाली आहे. त्यामूळे सभागृहनेते पदी कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक चर्चा होत्या. पण या साऱ्या चर्चा बाजूला सारुन अशोक वैती यांनाच पुन्हा एकदा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सभागृहनेता म्हणून संधी दिली आहे.
Ashok Vaity Taking Charge of Leader of Oppositon in Presence of Minister Ekanath Shinde
Ashok Vaity Taking Charge of Leader of Oppositon in Presence of Minister Ekanath Shinde

ठाणे  : माजी महापैार अशोक वैती यांना महापालिकेच्या सभागृहनेतेपदी बसण्याची संधी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पण त्यानंतरही केवळ शिंदे यांच्या उपस्थितीतच या खुर्चीवर बसण्याचा आग्रह वैती यांनी केला होता. अखेर हा हट्ट पुरविण्यासाठी आपल्या कामकाजातून वेळ काढून सोमवारी रात्री उशीरा वैती यांना एकनाथ शिंदे यांनी सभागृहनेतेपदाच्या खुर्चीवर बसवले.

सभागृहनेते पदासाठी सत्ताधारी शिवसेनेतून अनेक ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक होते. पण शिंदे यांच्या पाठींब्याने वैती यांना सभागृहनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण सभागृहनेतेपदी निवड झाल्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीतच खूर्चीवर बसण्याचा आग्रह वैती यांचा होता. सहा डिसेंबर रोजी त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. पण हा दिवस डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणाचा दिवस असल्याने शिंदे या दिवशी महापालिकेत आले नव्हते. हा कार्यक्रम रद्द झाल्यानंतरही वैती यांनी सभागृहनेतेपदाच्या खूर्चीत बसणे टाळले होते. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या भावनेची दखल घेऊन सोमवारी रात्री अखेर महापालिका मुख्यालयात येऊन त्यांना सभागृहनेतेपदाच्या खूर्चीत बसवले.

सभागृह नेते म्हणून कार्यरत असलेले नरेश म्हस्के यांची नुकतीच महापैारपदी निवड झाली आहे. त्यामूळे सभागृहनेते पदी कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक चर्चा होत्या. पण या साऱ्या चर्चा बाजूला सारुन अशोक वैती यांनाच पुन्हा एकदा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सभागृहनेता म्हणून संधी दिली आहे.

अशोक वैती यांनी 2009 ते 2012 मध्ये दरम्यान महापौर म्हणून काम करीत असताना ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाकांक्षी राबविले तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. अतिशय परखड विचार व अभ्यासपूर्ण मत मांडणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. नगरसेवक म्हणून काम करताना समाजात देखील त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रशासनावर देखील त्यांची चांगली पकड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com