ashok gehlot and bjp | Sarkarnama

अहंकारामुळे भाजपची सत्ता गेली - अशोक गेहलोत

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

जयपूर : कॉंग्रेसमुक्तीची भाषा करणारे मुक्त होतील असे सांगून भाजपची सत्ता गेली ती त्या पक्षाच्या अहंकारामुळे अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे राजस्थानचे ज्येष्ठ नेते व भावी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. 

या निवडणुकीत भाजपकडे लढण्यासाठी कुठलाच मुद्दा नव्हता, आम्ही मुद्दे घेऊन जनतेसमोर गेलो. भाजपच्या राज्यात जनता त्रस्त झाली होती. बेरोजगारी आणि महागाईमुळे जनता वैतागली होती तसेच नोटाबंदी आणि जीएसटी मुळे अनेकांचे नुकसान झाले होते असे सांगून गेहलोत म्हणाले आम्ही सर्वांना बरोबर घेऊन सरकार चालवू. गेहलोत यांनी भाजपच्या कॉंग्रेसमुक्त भारत या संकल्पनेवर जोरदार टीका केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख