अशोक डक यांच्यामुळे मुंबई बाजार समितीत बीडचा प्रथमच झेंडा

अशोक डक यांच्यामुळे मुंबई बाजार समितीत बीडचा प्रथमच झेंडा

माजलगाव : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत औरंगाबाद विभागातून माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दणदणीत विजय मिळविला. अशोक डक यांच्या रूपाने मुंबई बाजार समितीत बीड जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले. 

मुंबई बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक यांना औरंगाबाद विभागातून संधी दिली होती. त्यासाठी शनिवारी मतदान होवून आज सोमवारी निकाल जाहीर झाला. यात अशोक डक यानी 225 मतांनी दणदणीत विजय मिळवला. 
औरंगाबाद महसूल विभागासाठी 956 मतदार होते. त्यापैकी 944 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com