जिल्हा कॉंग्रेसला नव्या प्रदेशाध्यक्षांचा विसर, पोस्टरवर अशोक चव्हाणच कायम 

महाराष्ट्र प्रेदश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून नुकताच त्यांनी मुंबई प्रदेश कार्यालयात पदभार देखील स्वीकारला. परंतु औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसला बहुदा याचा विसर पडला की काय? असा प्रश्‍न पडतो. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने गांधीभवन येथे आयोजित बैठकीच्या ठिकाणी स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर नव्या प्रदेशाध्यक्षांऐवजी अशोक चव्हाण यांचेच छायाचित्र छापण्यात आल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा कॉंग्रेसला नव्या प्रदेशाध्यक्षांचा विसर, पोस्टरवर अशोक चव्हाणच कायम 

औरंगाबादः महाराष्ट्र प्रेदश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून नुकताच त्यांनी मुंबई प्रदेश कार्यालयात पदभार देखील स्वीकारला. परंतु औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसला बहुदा याचा विसर पडला की काय? असा प्रश्‍न पडतो. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने गांधीभवन येथे आयोजित बैठकीच्या ठिकाणी स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर नव्या प्रदेशाध्यक्षांऐवजी अशोक चव्हाण यांचेच छायाचित्र छापण्यात आल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी मोर्चे बांधणी करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

राज्य पातळीवर प्रदेशाध्यक्षपदामध्ये झालेला बदल अजूनही काही जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पचनी पडला नाही की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. कारण अजूनही कॉंग्रेसच्या बॅनरवर बाळासाहेब थोरांताना स्थान देण्यात आलेले नाही. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांच्या नावांची चाचपणी करण्यासाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्यांची बैठक गांधी भवन येथे बोलावण्यात आली होती. 

यावेळी उपस्थितांच्या स्वागतांसाठी व्यासपीठाच्या मागील बाजूस बॅनर लावण्यात आले होते. परंतु, या बॅनरवर नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या ऐवजी माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच स्थान देण्यात आले होते. बॅनरवर थोरातांचा फोटो नसल्यामुळे उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू होती. पण पदाधिकाऱ्यांच्या मात्र ही गोष्ट काही लक्षात आली नाही.  गांधी भवनात विविध कार्यक्रम, बैठका पक्षाच्या वतीने होत असतात. अशावेळी स्वागत करण्यासाठी एकच बॅनर तयार करण्यात आले आहे. तेच बॅनर आजच्याही बैठकीत लावण्यात आले. प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर बॅनर बदलण्यास बहुदा जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी विसरले असावेत, अशी चर्चा आता होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com