`वंचित'ने वस्तुस्थिती स्पष्ट करावी : अशोक चव्हाण 

अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची परस्पर विधाने येत आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, आघाडीसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. चर्चा करायला आम्ही आजही तयार आहोत, असे महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.
`वंचित'ने वस्तुस्थिती स्पष्ट करावी : अशोक चव्हाण 

नागपूर : अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची परस्पर विधाने येत आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, आघाडीसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. चर्चा करायला आम्ही आजही तयार आहोत, असे महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. 

आज सकाळी नागपुरात येताच डॉ.बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

कर्नाटकमध्ये वेगाने सुरु असलेल्या घडामोडींबद्दल विचारले असता, ते म्हणाले, की भाजपने देशाच्या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम केलय. हे लोकशाहीला न शोभणारे वर्तन आहे, पण जास्त काळ चालणार नाही. राजकारणात जय-पराजय होत राहते. आता सर्व कॉंग्रेसजणांनी एकत्र राहीले पाहीजे. आम्ही भाजपला प्रत्युत्तर नक्कीच देऊ. 

कॉंग्रेसमधील राजीनामा सत्राबद्दल छेडल्यावर, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाची जवाबदारी सर्वांनी घेणे अपेक्षीत होते, तशी ती घेतली गेली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी काम बंद केलेल नाही. अजूनही मी आणि माझे सर्व कार्यकर्ते काम करतोच आहे. केंद्रीय अध्यक्ष जी जबाबदारी देतील, ती पार पाडणार आहोत, असे श्री चव्हाण म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com